belgaum

हरवलेली पर्स प्रामाणिकपणे परत; बस वाहक व चालकाचे सर्वत्र कौतुक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मच्छे येथील रहिवासी चैत्राली संदीप वागोजी यांची बुधवार दि. 15-04-2026 रोजी उद्यमबाग ते पिरणवाडी दरम्यान बस प्रवास करत असताना पर्स हरवली होती. ही बस वायव्य कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बेळगाव येथील दुसऱ्या डेपोतील अनुसूची क्रमांक 108 (सी.बी.टी – तीर्थकुंडे मार्ग) वर धावत होती.

सदर बसमध्ये कर्तव्य बजावत असलेले बस वाहक सिद्धप्पा हडलगी (बिल्ला क्रमांक 5454) व चालक शिवानंद एस (चालक क्रमांक 425) यांनी प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडत हरवलेली पर्स परत केली.

बस सीबीटी येथे पोहोचल्यावर त्यांना संबंधित पर्स आढळली. त्यांनी तत्काळ संपर्क साधून चैत्राली वागोजी यांना बोलावले व पर्स सुरक्षितपणे सुपूर्द केली. त्या पर्समध्ये सुमारे 7,380 रुपये रोख रक्कम, सोन्याचा नथ, कानातले तसेच मोबाईल असा मौल्यवान ऐवज होता.

 belgaum

या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष वर्तनाबद्दल सिद्धप्पा हडलगी व शिवानंद एस यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी दाखवलेली प्रामाणिकता समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.