Friday, April 19, 2024

/

खरेदी दस्ताची नोंद मनपाला ठरतेय डोकेदुखी

 belgaum

भूमी अभिलेखा विभागातर्फे उपलब्ध होणाऱ्या मिळकतीच्या, उताऱ्याच्या कागद्पत्रांसंदर्भात दिरंगाई होत असल्याकारणाने नागरिकांची यामुळे गैरसोय होत आहे. याची दखल घेत आज सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी अनेक कार्यकर्त्यांसह मनपा उपायुक्तांनी भेट घेतली.

बेळगाव महानगरपालिकेचा भूमि अभिलेख विभाग (डिपार्टमेंट ऑफ लँड रेकॉर्ड्स) हा महसूल विभागाचा पाया असून या विभागाने तयार केलेल्या जमिनीच्या घर मिळकतीचे नगर भूमापन अभिलेखाच्या आधारे राज्यातील विविध विभागाकडून विकासात्मक कामे करण्याची कार्यवाही केली जाते.

मिळकत धारकांच्या हक्क विषयक वादात निर्णय घेण्यात येतात. पर्यायाने या विभागाकडून तयार करण्यात आलेल्या नोंदीच्या आधारे राज्यातील महसुली उत्पन्नात वाढ होणेच्या दृष्टीने वाटचाल होते. पण गेल्या सहा महिन्यांपासून मिळकतीचा उतारा मिळवण्यासाठी महानगरपालिकेच्या मुख्य महसूल कार्यालयाच्या फेऱ्या मारून थकलेले सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शुक्रवारी थेट मनपा उपआयुक्तांची भेट घेतली.

 belgaum

शासनाच्या नवीन पध्दतीद्वारे ई-आस्थी प्रणालीचा वापर करूनच मिळकत उतारा नोंद, पीआयडी क्रमांक देण्याची प्रक्रिया व्हायला हवी. याबाबत संबंधित कार्यालयात विचारणा करण्यात आली असता मनपा कर्मचारी कोरोनाच्या कामात व्यस्त आहेत असे यावेळी सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांची कमतरता असताना नव्या कर्मचाऱ्यांची भरती करावी, तसेच या सर्व गोष्टी सहज मिळाव्या यासाठी नवे संगणक उपलब्ध करून घ्यावे, आणि हे सर्व सुरळीत होईपर्यंत जुन्या पद्धतीने अर्ज आणि कागदपत्रांची व्यवस्था करण्यात यावी असे आवाहन जाधव यांच्यावतीने करण्यात आले. आणि या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरु करण्याची सूचनाही करण्यात आली.

ई-आस्थीमधून गेल्या सहा महिन्यांत केवळ एकच उतारा देण्यात आला आहे. जनसामान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जुन्या ओयासिस प्रणालीतूनही उतारे व क्रमांक देण्याची सूचना करावी. एखाद्याने उतारा, खाते बदल करण्यासाठी अर्ज केले असतील तर ते त्वरित उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी संतोष सर, महसूल वार्ड अधिकारी प्रकाश पाटील, नितीन जाधव, संजय नाईक,शिवानंद पाटील आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.