Thursday, April 25, 2024

/

राज्याची 20 हजाराच्या दिशेने वाटचाल : जिल्ह्यात आढळले आणखी 13 रुग्ण

 belgaum

गेल्या 24 तासात राज्यात आणखी तब्बल 1,694 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 3 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 19,710 इतकी झाली असून कोरोनामुळे राज्यात तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्ह्यात नव्याने 13 रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 336 इतकी वाढली आहे.

बेळगाव जिल्ह्यात काल सायंकाळपासून नव्याने 13 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 7 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. यापैकी पी -18290 या क्रमांकाचा 28 वर्षीय बेंगलोर जिल्ह्यातून बेळगावात आला आहे. पी -18291 या क्रमांकाच्या 29 वर्षीय पुरुष आणि पी -18292 क्रमांकाची 30 वर्षीय महिला या दोघांचा प्रवास इतिहास तपासला जात आहे. याव्यतिरिक्त पी -18293 क्रमांकाची 60 वर्षीय पुरुष, पी -18294 क्रमांकाची 35 वर्षीय महिला, पी -18295 क्रमांकाचे 10 वर्षीय बालक, पी -18296 क्रमांकाची 14 वर्षीय मुलगी, पी -18297 क्रमांकाचा 35 वर्षीय पुरुष, पी -18298 क्रमांकाची 21 वर्षीय महिला, पी -18299 क्रमांकाचा 28 वर्षीय पुरुष आणि पी -18300 क्रमांकाची 50 वर्षीय महिला हे सर्वजण धारवाड जिल्ह्यातील पी -12121 या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरणाग्रस्त झाले आहेत. याव्यतिरिक्त -18301 क्रमांकाचा 46 वर्षीय पुरुषाचा प्रवास इतिहास तपासला जात असून -18302 क्रमांकाची 29 वर्षीय महिला हुबळी -धारवाड येथून बेळगाव जिल्ह्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 26,337 नमुन्यांपैकी 23,057 इतक्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे 2379 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. जिल्ह्यात ॲक्टिव्ह केसेस 48 असून आज शुक्रवारी 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे पूर्णपणे कोरोना मुक्त होऊन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची एकूण संख्या 306 झाली आहे.

 belgaum

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 2 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शुक्रवार दि. 3 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 1,694 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 19,710 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 10,608 असून यापैकी 201 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात बुधवारी 471 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 8,805 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 21 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 293 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून त्यापैकी चामराजनगर वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 994 रुग्ण – एकूण रुग्ण 7173), बेळ्ळारी (97-1081), मंगळूर ( 97-1012) आणि बेळगाव (13-356).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.