Tuesday, May 14, 2024

/

41,581 झाली राज्यांची संख्या : जिल्ह्याची 500 कडे वाटचाल

 belgaum

गेल्या 24 तासात नव्याने आणखी 2,738 रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 41,581 झाली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात आज 27 रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 497 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 121 तर संपूर्ण राज्यात एकूण 24,572 ॲक्टिव्ह केसेस आहेत.

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात आणखी 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 497 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 362 जणांना कोरोना मुक्त झाल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात 121 अॅक्टिव्ह केसेस असून आज आणखी दोघांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 14 झाली आहे.

दरम्यान, राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 12 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज सोमवार दि. 13 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 2,738 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 41,581 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 24,572 असून यापैकी 545 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात शुक्रवारी 839 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 16,248 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 73 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 757 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

 belgaum

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात रामनगर वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 1315 रुग्ण – एकूण रुग्ण 19702), यादगिरी (162-1450), म्हैसूर (151-966) आणि बेळगाव (27-497).

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.