Thursday, April 25, 2024

/

स्वखर्चातून केली सुभाषनगरात सफाई

 belgaum

एका बाजूने एका गोष्टीचा तडा लागतो न लागतो तोच दुसऱ्या बाजूने दुसरी समस्या डोके वर काढू पाहते. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे अनेक नमुने दिवसेंदिवस पुढे येत असतात. याला कारणीभूत आहे ती ठिसूळ व्यवस्था आणि आळशी कर्मचारी. महानगर पालिकेपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सुभाषनगर परिसरात सातत्याने याचा अनुभव येथील नागरिकांना येतो.

समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या सुभाषनगरातील नागरिक नेहमीच विविध गोष्टींसाठी निवेदन सादर करतात. परंतु या भागाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कधी कचरा समस्या तर कधी ड्रेनेज ची समस्या, कधी गटारी तर कधी रस्त्याच्या समस्या! सातत्याने येथील नागरिक या गोष्टींच्या पाठपुराव्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु हा भाग अजूनही समस्यांच्या विळख्यातच अडकून पडला आहे.

ही एकंदर परिस्थिती पाहता येथील जागरूक नागरिकांनी स्वखर्चातून स्वच्छतेचे काम हाती घेऊन मनपाच्या डोळ्यात अंजन घातले आहे. निदान आता तरी मनपा प्रशासनाचे डोळे उघडतील अशी आशा येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

 belgaum
Drainage saaf safai
Drainage saaf safai

या भागात हिंदू – मुसलमान बांधव ऐक्याने राहतात. यामुळे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर स्वखर्चातून आणि श्रमदानातून येथील नागरिकांनी गटारी स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे.

सुभाषनगरमध्ये कायम ड्रेनेजच्या पाण्याची समस्या आहे. ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावरून वाहून गटारींमध्ये तुंबले आहे. याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच विविध रोगराईलाही सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी यासाठी समक्ष जाऊन आणि ऑनलाईन तक्रार करूनही याकडे पालिका प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. या कारणास्तव निवेदने आणि तक्रारींना योग्य उत्तर न मिळाल्याने इब्राहिम नंदगडी (इंजीनियर) इक़बाल कित्तूर , सुशांत पटेल, समद खानापूरी या सर्वांच्या प्रयत्नाने १५००० रुपये जमा केले. आणि गटारींमधील कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला.

रहिवाशांनी स्वतःहून पुढाकार घेऊन केलेल्या या कामामुळे आता तरी पालिका प्रशासनाला जाग येते का? आणि याची दखल घेऊन यापुढील काळात पालिका प्रशासन कोणते पाऊल उचलते याकडे येथील नागरिक कटाक्षाने पहात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.