Friday, April 26, 2024

/

हत्तरगी अपघातात कणबर्गी येथील वृद्धाचा मृत्यू

 belgaum

कणबर्गी येथील एका वृद्धाचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघात हत्तरगी जवळ झाला असून या अपघातात त्याची पत्नी जखमी झाले आहे. ही घटना समजताच कणबर्गी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

तर मंगळवारी सकाळी संबंधित झालेल्या व्यक्ती वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हत्तरगी टोल नाक्याजवळ सोमवारी दुपारी झालेल्या कार अपघातात कणबर्गी (ता. बेळगाव) येथील एका वृध्दाचा मृत्यू झाला. यमकनमर्डी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

सिद्राय रायाप्पा मुचंडीकर (वय 64, रा. कुंभार गल्ली, कणबर्गी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवीचे नाव आहे. पत्नी लक्ष्मी सिद्राय मुचंडीकर (वय 55) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. कारमधून हिडकल डॅमहून बेळगावकडे येताना हिडकल डॅमकडे जाणाऱ्या दुसऱ्या कारने धडक दिल्याने ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 belgaum

मंगळवारी 7 जुलै रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. कणबर्गी येथील मराठी प्राथमिक शाळेचे माजी एसडीएमसी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुचंडीकर यांचे ते वडील होत. गुरुवारी रक्षाविसर्जन होणार आहे. यमकनमर्डी पोलीस पुढील तपास करीत आहेत. अपघाताने कणबर्गी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.