Saturday, April 27, 2024

/

सातपैकी 3 शहरातील पॉजिटीव्ह-पोलिसाला देखील झाली लागण

 belgaum

बेळगाव शहरातील कोरोनाची दशहत कमी होताना दिसत नसून गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात 15 रुग्ण आढळले असून दोघे मयत झाले आहेत त्यामुळे मयतांची संख्या देखील वाढून 4 झाली आहे. चौथा मयत रुग्ण हा अथणी येथील आहे.

भोवी गल्ली,महंतेश नगर,शास्त्रीनगर,या भागातील हे तीन रुग्ण आहेत तर इतर चार चंदनहोसुर मालबाग गवणी आणि सौन्दत्ती अशी माहिती मिळाली आहे.बेळगाव शहरातील कोरोना पोजिटीव्ह रुग्णांची संख्या 5 झाली असून आजचे तिघे आणि वडगांव आणि वंटमुरी कॉलनी येथील एक सामील आहे.

पोलिसाला कोरोनाची बाधा

 belgaum

निपाणी जवळील कोगनोळी चेक पोस्ट वर सेवा बजावत असणाऱ्या 46 वर्षीय पोलिसाला कोरोनाची बाधा झाली आहे गुरुवारी सापडलेल्या सात पॉजिटिव्ह पैकी एक पोलीस कर्मचारी सामील आहे. चेक पोस्ट वर सेवा बजावल्या नंतर त्याला क्वारंटाइन करण्यात आले होते 30 जून रोजी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते आजच्या बुलेटिन मध्ये पी 17021 हा पोलीस कर्मचारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.