Thursday, April 25, 2024

/

उद्या 8 जूनपासून शिक्षक राहणार सेवेवर हजर?

 belgaum

2020 – 21 शैक्षणीक वर्ष सुरू करण्याबाबत सरकारचा निर्णय अजून व्हावयाचा असताना राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी सोमवार दि. 8 जूनपासून सेवेवर हजर राहण्याचा आदेश शिक्षण खात्याने बजावला आहे. तथापि याला शिक्षक संघटनेने विरोध दर्शविला असून कोरोनाच्या वाढत्या आकड्यांमुळे शासनाने या आदेशाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे.

शिक्षण खात्याने यापूर्वी 5 जूनपासून शिक्षकांनी शाळेत हजर राहण्याचा आदेश दिला होता. परंतु या आदेशातबद्दल शिक्षकांनी नाराजी दर्शविल्यामुळे शिक्षण आयुक्तांनी गेल्या 4 जून रोजी नवा आदेश बजावला असून त्या आदेशानुसार राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी 8 जूनपासून तात्कालिक वेळापत्रकाप्रमाणे शाळेत हजर राहावे, असे सांगण्यात आले आहे. तथापि या आदेशाला देखील शिक्षक संघटनेने विरोध दर्शवला असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने या आदेशाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. शासनाला निवेदन सादर करतेवेळी शिक्षक संघटनेचे जयकुमार हेबळी सरचिटणीस ए. एफ. दोड्डगौडर आदींसह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

बेळगाव जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने कंटेनमेंट झोनमध्येही सेवा बजावली आहे. मुलांना शिधा वाटप करणे, कोरोना चेकपोस्ट ड्युटी, मुलांचे आरोग्य सर्वेक्षण, घरोघरी आरोग्य सर्वेक्षण ही कामे करण्याबरोबरच रुग्णालय, रेल्वे व बस स्थानक, कोरोना हॉटस्पॉट भागातही शिक्षकांनी सेवा बजावली आहे. त्याचप्रमाणे अनेक शाळा काॅरन्टाईन केंद्र म्हणून वापरल्या गेल्या आहेत. त्यांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण होणे आवश्यक आहे. याखेरीज तालुक्यातील अनेक गावातील शाळांमध्ये ते शेकडो जणांना काॅरन्टाईन करण्यात आले आहे, याची दखल घेतली जावी असे निवेदनात नमूद आहे.

 belgaum

*1जुलैपासून शाळा सुरू : अधिकृत घोषणा नाही*
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा – महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या काथही दिवसांपासून 15 जूनपर्यंत किंवा 1 जुलैपासून शाळा – महाविद्यालय सुरू होणार अशी चर्चा सुरू आहे. तथापि राज्यातील शाळा 1 जुलैपासून सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य सरकारने अद्याप केलेली नाही, असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. शाळा सुरू होणार अशी चर्चा असली तरी त्यात काहीही तथ्य नाही. राज्यसरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील शाळा केंव्हा सुरू करायच्या याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे शाळा कधी सुरू होणार याकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र शिक्षण खात्यातर्फे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्व काळजी घेऊन पुढील महिन्यापासून टप्प्याटप्प्याने प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. मात्र शाळा सुरू करण्यापूर्वी राज्यातील पालकांकडून मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणती काळजी घ्यावी याबाबत सूचना मागविण्यात आल्या आहेत. तथापि पालक संघटनांनी सद्य परिस्थितीत शाळा सुरू करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.

राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे त्यावर बोलताना शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. पालकांच्या सूचनांनुसार अहवाल तयार करून केंद्राकडे धाडला जाईल. त्यानंतरच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे सांगितले. शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर अध्यादेश अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे 1 जुलै पासून शाळा सुरू होतील असे वाटत नाही, अशा प्रतिक्रिया पालक व शिक्षक शिक्षण तज्ञाकडून व्यक्त केल्या जात आहे. तसेच एक येत्या 1 जुलैपासून शाळा सुरु करण्यास तीव्र विरोध दर्शविला जात आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही, तसेच कोणतेही निर्देश राज्यांना देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम आहेत, अशी माहिती ट्विट करून देण्यात आली आहे. राज्य शासनाने सद्य परिस्थितीत शाळा सुरू केल्यास पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत. लहान मुलांची रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. तेंव्हा शासनाने सध्या ऑनलाईन शिक्षणावर अधिक भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.

येत्या 1 जुलैपासून शाळा सुरू झाल्यास टप्प्याटप्प्याने शाळा प्रारंभ होण्याचे संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल. इयत्ता चौथी ते सातवी शाळा : 1 जुलैला प्रारंभ, इयत्ता पहिली ते तिसरी शाळा : 15 जुलै, इयत्ता आठवी ते दहावी शाळा : 15 जुलै पूर्व प्राथमिक शाळा 20 जुलै.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.