Friday, April 26, 2024

/

त्या परिक्षार्थीला कोरोना

 belgaum

एका 18 वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. चेन्नईहून एसएसएलसीची परीक्षा देण्यासाठी तो परत आला होता.
तो कित्तुर जवळील खेड्यातील आहे. या तामिळनाडूमधील बेळगाव रिटर्नीस
आज जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
गेल्या 24 तासांत जिह्यातील 32 संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमधील चाकरमान्यांची संख्या शनिवारी सायंकाळपर्यंत 3705 वर पोहोचली आहे. तर शनिवारी आणखी एका कोरोना बाधिताची भर पडली आहे.
जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने शुक्रवारी रात्री दिलेल्या माहितीनुसार प्रयोग शाळेत 1128 स्वॅब पाठविण्यात आले होते. यापैकी 32 अहवाल निगेटिव्ह आले असून 1096 जणांचे अहवाल यायचे आहेत. एक दोन दिवसांत हे अहवाल प्रयोग शाळेतून येणार आहेत. त्यानंतर जिह्यातील कोरोनाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 5 हजार 715 जणांनी 14 दिवसांचे, 9 हजार 61 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले असून आतापर्यंत जिह्यातील 303 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी 281 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 29 जणांवर उपचार करण्यात येत आहेत.
जिह्यातील 17 हजार 214 जणांचे स्वॅब तपासणी झाली आहे. यापैकी 15 हजार 389 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 303 जणांचा पॉझिटिव्ह आला आहे. आणखी 1096 अहवालांची प्रशासनाला प्रतिक्षा आहे. आरोग्य विभागाने जिह्यातील 18 हजार 510 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.