Friday, March 29, 2024

/

संगोळी रायन्ना सोसायटीची मालमत्तेची होणार विक्री

 belgaum

संगोळी रायन्ना सोसायटीची मालमत्ता सरकारने ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी म्हणून ताब्यात घेऊन पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली आहे.सोसायटीच्या एकूण 110 मालमत्ता असून त्या सोळा व्यक्तींच्या नावे होत्या.या मालमत्तांच्या उताऱ्यावर आता सरकारचे नाव नोंद झाले आहे.
उप विभाग अधिकाऱ्यांनी आता जमीन विक्री करून पैसे ठेवीदारांना देण्यासाठी म्हणून न्यायालयीन प्रक्रियेला प्रारंभ केला आहे.न्यायालयाने परवानगी दिल्यावर त्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांना पैसे देण्यात येणार आहेत.

संगोळी रायन्ना सोसायटीत अनेक जणांनी आपली आयुष्यभर कमावलेली कमाई ठेव म्हणून ठेवली होती.पण सोसायटीच्या गैरकारभारामुळे सोसायटी अडचणीत आली.हे प्रकरण मोठे असल्याने सरकारने यात लक्ष घालून ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळावेत म्हणून कार्यवाही सुरू केली आहे.APPUgol

सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पूगोळ यांनी संस्थेतील पैसा वापरून वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी खरेदी केल्या होत्या हा सगळा शेकडो कोटींचा व्यवहार होता नंतर काळात जमिनीचे दर कोसळल्याने खरेदी जमीनीची किम्मत कमी झाली त्यामुळे सोसायटी अडचणीत आली.

 belgaum

सोसायटीच्या बेळगाव सह अनेक गावांत शाखा होत्या संस्थेत ठेवलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ग्राहकांनी संस्थेकडे जाऊन आंदोलन केले अनेकदा शासनाला निवेदने दिली या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात सरकारने बेळगावचे प्रांताधिकारी आणि मनपा आयुक्त यांची सोसायटीच्या मालमत्ता शोधून त्यावर सरकारचे नाव दाखल करून ठेवीदारांना त्यांचे पैसे तूर्त मिळावे म्हणून कार्यवाही सुरू केली आहे.
आता न्यायालयाने परवानगी दिल्यावर मालमत्तांची विक्री केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.