बंदुकीचा धाक दाखवून सराफी दुकानातून दागिने लुटणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.अटक केलेल्या व्यक्तीचे नाव वैभव पाटील रा मजगाव असे आहे.
समृद्धी जुवेलर्स या हिंडलगा रोडवरील दुकानात 27 जून रोजी एका व्यक्तीने सोन्याच्या चेन बघण्याच्या निमित्ताने प्रवेश केला.मालकाने सोन्याच्या चेन दाखवल्यावर त्या व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून तीन लाख रु किमतीच्या चार सोन्याच्या चेन घेऊन बाईकवरून फरार झाला होता.
या संबंधी दुकान मालकाने पोलिसात तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी तपास करून वैभव पाटील याला अटक करून त्याच्याकडून चार सोन्याच्या चेन,एक।गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.