Saturday, April 20, 2024

/

राज्यांची संख्या झाली 4,320 : नव्याने आढळले 257 रुग्ण

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील 12 कोरोनाग्रस्त रुग्णांसह राज्यात आज गुरुवार दि. 4 जून रोजी नव्याने 257 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4,320 इतकी वाढली आहे. कोरोनामुळे राज्यात काल बुधवार सायंकाळपासून आणखी 4 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 57 झाली आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 3 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज गुरुवार दि. 4 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 257 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 1 आंतरराष्ट्रीय, तर 155 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे. नव्याने 12 रुग्ण सापडल्यामुळे गुरुवारी बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 216 इतकी वाढली आहे.

राज्यातील 4,320 कोरोनाग्रस्तांपैकी 1,610 जणांना आत्तापर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 2,651 असून यापैकी 13 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 4 मृत्यू झाल्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 57 झाली असून यापैकी दोघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांपैकी उडपी (92) जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकातील एकूण 29 जिल्हे कोरोनाग्रस्त असून या जिल्ह्यात आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. उडपी (आज 92 -एकूण 564), कलबुर्गी (0 -510), बेंगलोर शहर (9 – रुग्ण 424), रायचूर (88 -356), मंड्या (15 -317), यादगिरी (0 -299), बेळगाव (12 -222), हासन (15 -197), दावणगिरी (13 -179), बिदर (0-175), चिकबळ्ळापूर (2-145), मंगळूर (4-135), विजयपुरा (1 -134), म्हैसूर (1 -97), बागलकोट (0 -90), कारवार (0 -85), शिमोगा (0 -53), बेळ्ळारी (1 -53), धारवाड (0 -51), चित्रदुर्ग (0 -40), गदग (2 -37), तुमकुर (1 -35), कोलार (0 -28), बेंगलोर ग्रामीण (0 -19), चिक्कमंगळूर (0 -18), हावेरी (0 -17), कोप्पळ (0 -04), कोडगु (0 -03) आणि रामनगर (आज 0 – एकूण रुग्ण 2). याखेरीज 34 जण राज्याच्या अन्य भागातील आहेत

*जिल्ह्यात 14,555 जणांचे निरीक्षण पूर्ण*

बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार गुरुवार दि. 4 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील एकूण 14,555 निरीक्षण पूर्ण झाले असून 11,442 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 216 इतकी झाली असून अद्याप 1,411 नमुन्यांचे अहवाल हाती येणे बाकी आहेत. 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 5,433 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 97 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 2,000 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 7,025 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 13,259 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 216 (1) नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्याबाहेरील (बागलकोट) पॉझिटिव्ह रुग्ण 08 आहेत. जिल्ह्यात ॲक्टिव्ह केसीस 97 असून एकाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांपैकी 126 रुग्ण कोरोना संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.