Saturday, April 20, 2024

/

सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याला दिलासा : 6,313 नमुने निगेटिव्ह

 belgaum

सलसलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि.13) एकही कोरोना बाधित रुग्ण न आढळल्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार बुधवार दि. 13 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील 8,083 जणांचे निरीक्षण झाले असून आतापर्यंत 6,313 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 107 (1) इतकी स्थिर असून 284 नमुन्यांचे अहवाल अद्याप हाती येणे बाकी आहेत.

बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने जाहीर केलेल्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 13 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 8,083 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 953 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 72 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 5,207 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 1,851 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 6,788 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 107 (1) नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्याबाहेरील (बागलकोट) पॉझिटिव्ह रुग्ण 08 आहेत. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 6,313 नमुने निगेटिव्ह असून ॲक्टिव्ह केसीस 72 आहेत. त्याचप्रमाणे 284 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून 42 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, भारताबाहेरील कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तींनी अथवा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नसली तरीही भारतात आलेल्या दिवसापासून 14 दिवस घरगुती विलगीकरणात रहावे, घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे संबंधितांनी स्वतःहून नजीकच्या सरकारी हॉस्पिटल अथवा 104 हेल्थ – हेल्पलाईन कॉल सेंटरशी किंवा आरोग्य सहाय्यवाणी डीएसयू बेळगाव 0831- 2424284 येथे संपर्क साधून आपली माहिती द्यावी. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. खोकला अथवा शिंक आल्यास टिश्शू पेपर किंवा रुमाल तोंडावर धरावा. प्रत्येकाने आपले हात साबण लावून पाण्याने अथवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग शक्यतो टाळावा, आदी खबरदारीच्या सूचनाही जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालयाच्या सर्व्हिलन्स युनिटने आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जनतेला दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.