Friday, September 20, 2024

/

115 वर्षाचे “हे” मंडळ साध्या पद्धतीने साजरा करणार गणेशोत्सव

 belgaum

115 वर्षाची भव्य परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळकांच्या पावन हस्ते स्थापन झालेल्या मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक या मंडळाने देशभरामध्ये कोरोनामुळे झालेल्या सामाजिक, आर्थिक व जीवित नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील झेंडा चौक येथील मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध व्यापारी विकास कलघटगी हे होते. यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबरोबरच यंदाची श्री गणेश मूर्ती देखील फक्त 2 ते 2.5 फूट करण्याचे ठरविण्यात आले. गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या मंडप आरास व अन्य गोष्टींना फाटा देऊन मंडळाचे यावर्षीची अध्यक्ष विकास कलघटगी यांच्या निवासस्थानी श्री मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. तसेच फक्त मंत्रपुष्प, सहस्त्र वदन असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही कोणत्याही प्रकारच्या वर्गणीसाठी तगादा न लावला जाऊ नये. प्रतिवर्षीप्रमाणे यंदा शरीरसौष्ठव स्पर्धा, करेला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता त्याऐवजी समाजहिताचा विचार करून मार्केटमध्ये होणाऱ्या चोऱ्या किंवा अवैध प्रकार टाळण्यासाठी उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण झेंडा चौक येथे बसवण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

बैठकीप्रसंगी परशुराम कलघटगी, एम. के. दोरकाडी, अजित सिद्दणावर, अमित किल्लेकर, गिरीश पाटणकर, विनायक शासनी, प्रवीण पाटणेकर, प्रदीप सिद्दणावर, राजशेखर गाढवी आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.