Saturday, April 27, 2024

/

24 तासात राज्याने ओलांडला 3 हजाराचा टप्पा :1218 जणांना डिस्चार्ज

 belgaum

कर्नाटक राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्यने रविवारी 3 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज रविवार दि. 31 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 299 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या 3,221 इतकी वाढली असून यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 13 रुग्णांचा समावेश आहे.

कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि 30 मे सायंकाळी 5 वाजल्यापासून आज रविवार दि. 31 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 299 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 3,221 झाली आहे. यापैकी 1,218 जणांना आत्तापर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात राज्यात ॲक्टिव्ह केसेस 1,950 असून यापैकी 15 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 51 झाली असून यापैकी दोघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे. नव्याने आढळून आलेल्या 299 रुग्णांमध्ये 7 आंतरराष्ट्रीय प्रवाशांसह 255 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांपैकी रायचूर (83) जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल , अनुक्रमे यादगिरी (44), बिदर (33) आणि कलबुर्गी (28) यांचा क्रमांक लागतो. कर्नाटकातील एकूण 29 जिल्हे कोरोनाग्रस्त असून या जिल्ह्यात आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 21 – एकूण रुग्ण 357), यादगिरी (44 -285), कलबुर्गी (28 -281), मंड्या (13 -270), रायचूर (83 -217), उडपी (10 -187), बिदर (33 -163), बेळगाव (13 -160), हासन (0 -157), दावणगिरी (6 -156), चिकबळ्ळापूर (0 -136), मंगळूर (14 -125), विजयपुरा (26 -122), म्हैसूर (0 -94), कारवार (5 -82), बागलकोट (0 -77), बेल्लारी (1 -48), धारवाड (0 -45), शिमोगा (1 -42), चित्रदुर्ग (1 -39), गदग (0 -35), तुमकुर (0 -31), कोलार (1 -23), चिक्कमंगळूर (0 -18), बेंगलोर ग्रामीण (0 -15), हावेरी (0 -14), कोप्पळ (0 -4), कोडगु (0 -3) आणि रामनगर (आज 0 – एकूण रुग्ण 1). याखेरीज 34 जण राज्याच्या अन्य भागातील आहेत

 belgaum

बेळगावात आढळलेले सर्व 13 रुग्ण क्वारंटाइन मध्ये असलेले असून बेळगाव तालुक्यातील 5 चिकोडी तालुक्यातील पाच आणि हुक्केरी तालुक्यातील तिघे जण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.