Thursday, April 18, 2024

/

हट्ट न पुरवल्याने बालकाची आत्महत्या

 belgaum

आई वडिलांनी आत्याच्या घरी जाण्याचा हट्ट न पुरवल्याने नाराज झालेल्या चौदा वर्षीय बालकाने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावात घडली आहे. आयुष बाळाराम धामणेकर वय 14 रा.कुद्रेमानी बेळगाव असे या गळफास लावून घेतलेल्या विध्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयुष याने गेल्या दोन दिवसांपासून आत्याच्या गावी जाऊया असा तगादा आई वडिलांकडे लावला होता. लॉक डाऊन असल्याने नंतर जाऊ, असे आई वडिलांनी सांगितले होते. उद्या गुरुवारी जायचे देखील ठरले होते. मात्र नाराज होऊन त्याने घरातच नायलॉन दोरीने फास लाऊन घेत आत्महत्या केली.

आयुष हा इयत्ता आठवीत शिकत होता. त्याच्या पश्चात्य बहीण, आई, वडील असा परिवार आहे.कुद्रेमानी कृषी पत्तीनं संस्थेचे कार्यवाह बाळाराम धामणेकर यांचा तो एकुलता एक मुलगा होता.काकती पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.