बीम्स व फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

0
 belgaum

लॉक डाऊनच्या कालावधीत रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ उडत आहे. याची दखल घेऊन फेसबुक फ्रेंड्स सर्कल व बिमस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दि. 29 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केल होते.दुपारी बारा वाजे पर्यंत 16 जणांनी रक्तदान केलं होतं.

टिळकवाडी येथील लेले ग्राउंड मैदानावर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी बीम्सच्या रक्त संकलन विशेष होण्याची सोय करण्यात आली आहे. या वाहनात एका वेळी दोघांना रक्तदान करता येणार आहे. बीम्सतर्फे गर्भवती, रक्त पेशी कमी असणारे रुग्ण, बीपीएल कार्डधारक तसेच गरीब गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त देण्याची व्यवस्था आहे. या शिबिरामुळे गरजूंसाठी मदत होणार आहे.

bg
Fb friends circle blood donation camp
Fb friends circle blood donation camp

रक्तदान शिबिरात रक्तदान करणार्‍या दात्यांची रक्ततपासणी
(नॅट  टेस्ट) बेंगलोर येथे होणार आहे. तेंव्हा इच्छुकांनी शिबिरात भाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन बीम्स रक्त भांडार प्रमुख डाॅ. श्रीदेवी बोभाटी व फेसबुक फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष संतोष दरेकर यांनी केले आहे.

या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करणारे वकील विकास मुलींमनी आणि गणेश प्रभू या दोघांनी शिबिरात सहभागी होत असतेवेळी के एल ई मधल्या हृदय विकाराच्या रुग्णाला रक्तदान केलं.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.