Tuesday, April 30, 2024

/

राज्यात नव्याने आढळले 105 रुग्ण : कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या झाली 1,710

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील एका रुग्णासह राज्यात विविध ठिकाणी शुक्रवार दि. 22 मे 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत नव्याने 105 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित यांची संख्या 1,710 इतकी वाढली
आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार 21 मे सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शुक्रवार 22 मे दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यात आणखी 105 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 64 पुरुषांसह 41 महिला रुग्णांचा समावेश आहे. परिणामी राज्यातील कोरोना बाधित यांची संख्या एकूण 1710 इतकी झाली असून यापैकी आतापर्यंत 588 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोना मुळे राज्यात 41 जणांचा मृत्यू झाला असून 1,080 ॲक्टिव्ह केसेस आहेत. नव्याने आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तामध्ये बेळगाव जिल्ह्यातील पी -1687 क्रमांकाच्या 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. सदर रुग्ण झारखंड येथून बेळगावात आला असल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्यातील 105 नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण चिकबळ्ळापूर येथील आहेत. चिकबळ्ळापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 19 तासात तब्बल 43 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्याचप्रमाणे हासन जिल्ह्यात 14 रुग्ण, तुमकुर येथे 7 रुग्ण तर बेंगलोर ग्रामीण, चिकमंगळूर व बेंगलोर शहर येथे प्रत्येकी 5 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. याव्यतिरिक्त राज्यातील धारवाड, मंड्या, बागलकोट, चित्रदुर्ग, दावणगिरी, विजयपुरा, बेळगाव, बिदर, हावेरी, कारवार व मंगळूर या जिल्ह्यांमध्ये नव्याने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.