Thursday, March 28, 2024

/

आणखी दोघे जण झाले बरे

 belgaum

गुरुवारी सकाळच्या बुलेटिन मध्ये हिरेबागेवाडी येथील 13 वर्षीय बालिकेला कोरोनाची बाधा झालेली बातमी आली असतानाच आणखी सुखद बातमी बेळगावसाठी आली आहे. दोघे जण पोजिटिव्ह रुग्ण बरे झाले असून त्यांना गुरुवारी जिल्हा रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Hospital dischage
गुरुवारी बरे झालेल्या रुग्णांत एक रायबाग कुडची तर एक हिरेबागेवाडीच्या रुग्णांचा समावेश आहे.हिरेबागेवाडी येथील पी-284 आणि कुडची येथील पी 300 या दोघांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

बेळगाव जिल्ह्यात एकूण 74 पोजिटिव्ह पैकी 36 रुग्ण म्हणजेच एकूण पैकी जवळपास अर्धे रुग्ण बरे झाले आहेत. एक वृद्धेचा मृत्यू झालाय.बेळगाव जिल्ह्याचा ऑरेंज झोन मध्ये समावेश झाल्या पासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.