Saturday, April 27, 2024

/

पदवीपूर्व व पदव्युत्तर परीक्षा होणार जुलैमध्ये – डाॅ. अश्वथ नारायण

 belgaum

राज्यातील विविध विद्यापीठांच्या पदवीपूर्व (युजी) आणि पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर परीक्षा येत्या जुलै महिन्यात घेतल्या जाणार असून त्याचे निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण खात्याचे मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी  सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण खात्याचे मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, आम्ही राज्यातील सर्व विद्यापीठांच्या उपकुलगुरू उंची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून त्यांच्याकडून पदवीपूर्व आणि पदव्युत्तर परीक्षांच्या तारखांसंदर्भात सूचना जाणून घेतल्या. प्रलंबित अभ्यासक्रम पूर्ण करणे ही सध्याची समस्या असल्याने शैक्षणिक संस्थांनी यापूर्वीच ऑनलाइन शैक्षणिक वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. त्याप्रमाणे अनेक ॲप्सद्वारे तज्ज्ञ मंडळींकडून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासंदर्भातील धडे दिले जात आहेत. विद्यापीठ पातळीवर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्याचप्रमाणे राज्याच्या उच्च शिक्षण खाते देखील त्या अनुषंगानेच प्रयत्नशील आहे यासाठी येत्या जुलै महिन्यात शैक्षणिक वर्ग घेण्याबरोबरच पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्याचप्रमाणे जूनमध्ये हे पदवीपूर्व दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्याची योजना आखण्यात आली आहे या परीक्षांचा निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर केला जाईल, असे उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी स्पष्ट केले.

याखेरीज आणखी जास्त वेळ वाया जाऊ नये यासाठी संबंधित परीक्षा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्याच्या दृष्टीनेदेखील तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. हे सर्व नियोजित पद्धतीने पार पडले तर पुढील शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ फक्त दोन महिने उशिरा होईल, असेही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण खात्याचे मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी सांगितले.

 belgaum

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.