Tuesday, April 30, 2024

/

राजस्थानला जाणाऱ्या 99 मजुराना पकडले

 belgaum

राजस्थानला ट्रक मधून जाणारे 99 जण बागेवाडी चेकपोस्टवर तपासणीच्या वेळी सापडले आहेत.त्यांना ताब्यात घेऊन बेळगावला पाठवण्यात आले .बेळगावात त्यांची आरोग्य तपासणी केली असता त्यांच्यापैकी एक जण करोना संशयित रुग्ण आढळला आहे.त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या व्यक्तीचा रिपोर्ट पोजीटिव्ह आला तर करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे. कारण हे सगळे एकाच ट्रक मधून प्रवास करून आले आहेत.बंगलोरहून राजस्थानला हे मजूर आपल्या कुटुंबासमवेत चालत निघाले होते.चालत जात असताना राष्ट्रीय महामार्गावर एक राजस्थानची ट्रक दिसली.ती ट्रक थांबवून त्यांनी सगळ्यांना राजस्थानला नेण्याची विनंती केली.

ड्रायव्हरने त्यांना ट्रकमध्ये बसण्यास परवानगी दिली.पण बेळगाव जवळील हिरेबागेवाडी येथे तपासणीच्या वेळी पोलिसांना ट्रकमधून जाणारे हे 99 जण सापडले.नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.या सगळ्यांना सिपीएड कॉलेज येथे उभारण्यात आलेल्या तपासणी केंद्रात नेण्यात आले.नंतर त्यांचे समज कल्याण खात्याच्या वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.