Wednesday, May 1, 2024

/

जिल्ह्यात तब्बल 1018 जण निरीक्षणाखाली-381क्वांरंटाईन

 belgaum

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या सोमवार दि. 6 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 1018 इतकी झाली आहे. कोरोना विषाणू निदानासाठी एकूण 83 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत धाडण्यात आले असून त्यापैकी 7 नमुन्यांचा रिपोर्ट पाॅझेटिव्ह आला असून 69 नमुने निगेटिव्ह आहेत तर साप नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटच्या प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवारी दि. 6 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 1018 संशयित व्यक्तींची वैद्यकीय निरीक्षण अर्थात तपासणी करण्यात येत आहे. 14 दिवसांसाठी घरगुती विलगीकरण (आयसोलेशन) केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 381 झाली असून हॉस्पिटलमध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 26 आहे. आयसोलेशन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 408 आहे, तर आयसोलेशनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 203 आहे. कोरोना विषाणू निदानासाठी एकूण 83 जणांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 7 नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित 69 नमुने निगेटिव्ह असून साथ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

दरम्यान राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी ही संख्या 163 इतकी झाली होती. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 7 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील बीम्स कोव्हीड हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये काल रविवारपर्यंत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आणखी 4 जणांची भर पडली आहे. त्यामुळे सध्या या हॉस्पिटलमध्ये एकूण 7 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या कोरोना बाधित रुग्णांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.

 belgaum

भारताबाहेरील कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तींनी अथवा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नसली तरीही भारतात आलेल्या दिवसापासून 14 दिवस घरगुती विलगीकरणात रहावे, घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे संबंधितांनी स्वतःहून नजीकच्या सरकारी हॉस्पिटल अथवा 104 हेल्थ – हेल्पलाईन कॉल सेंटरशी किंवा आरोग्य सहाय्यवाणी डीएसयू बेळगाव 0831- 2424284 येथे संपर्क साधून आपली माहिती द्यावी. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. खोकला अथवा शिंक आल्यास टिश्शू पेपर किंवा रुमाल तोंडावर धरावा. प्रत्येकाने आपले हात साबण लावून पाण्याने अथवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग शक्यतो टाळावा, आदी खबरदारीच्या सूचनाही जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालयाच्या सर्व्हिलन्स युनिटने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहेत.

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.