Monday, April 29, 2024

/

भाजी खरेदी विक्रीसाठी 142 गाळे

 belgaum

कोरोनाच्या धास्तीमुळे भाजी मार्केटमध्ये होत असलेल्या गर्दीचा विचार करून एपीएमसी प्रशासनाने तीन ठिकाणी भाजी विक्रीची केंद्रे स्थापन केली आहेत. या तिन्ही ठिकाणी 142 गाळ्यांची निर्मिती करून शेतकरी व ग्राहकांची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.

जोपर्यंत कोरोणाची धाती संपत नाही तोपर्यंत ही भाजी मार्केट त्या ठिकाणी सुरू ठेवण्यात येणार आहेत. याची माहिती शेतकऱ्यांनी घ्यावी याच बरोबर ज्या भागातील शेतकऱ्यांना जे भाजीमार्केट सोयीचे वाटेल त्या ठिकाणी त्यांनी भाजी विक्री करावी असे आवाहनही करण्यात आले आहे. विविध ठिकाणी भाजीविक्री करून आपले हाल करून घेण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तीन ठिकाणी भाजी विक्री केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. संबंधित व्यापाऱ्यांनी आपले गाळे हाती घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत व्यापारी आपले गाळे ताब्यात घेणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Korona temprary wholsale vegetable market
Korona temprary wholsale vegetable market

बी एस येडीयुराप्पा मार्गाजवळ मालीनी सिटी येथे 60 गाड्यांची उभारणी करण्यात आली आहे. याचबरोबर ऑटो नगर आरटीओ परिसरात 42 गाळे आणि हिंडाल्को इथे 40 गाळे तयार करण्यात आले आहेत. या साऱ्यांचे काम अंतिम टप्प्यात असून व्यापाऱ्यांनी आपापले गाळे सोमवारी सायंकाळपर्यंत ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मंगळवार पासून या ठिकाणी भाजी विक्री खरेदी करण्यात येणार आहे.

 belgaum

कोरोणामुळे अनेक जण धास्तावले आहेत. त्याचबरोबर एपीएमसी येथील भाजी मार्केटमध्ये मोठ्याने गर्दी होत असल्याने याची खबरदारी म्हणून शहराच्या बाहेर भाजी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामधील पोदार येथे सुरु करण्यात येणारे भाजी मार्केट काही कारणास्तव स्थगित करण्यात आले आहे. अशी माहिती देण्यात आली. सध्या शहराबाहेरील तीन ठिकाणी भाजी मार्केट सुरू करण्यात येणार आहे. तेव्हा शेतकरी व्यापारी व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन एपीएमसी तर्फे करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.