Friday, April 26, 2024

/

पिरनवाडी येथे एकाची आत्महत्या

 belgaum

शनिवारी सिद्धेश्वर गल्ली पिरणवाडी तालुका बेळगाव येथे राहणारा रहिवाशाने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. नेमके कोणत्या करण्यासाठी त्यांनी आत्महत्या करून घेतली हे पोलीस तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

संभाजी रामचंद्र घेवडे वय 45 असे त्या युवकाचे नाव आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलिस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. या घटनेने सिद्धेश्वर गल्ली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पिरनवाडी येथील संभाजी रामचंद्र घेवडे यांनी केलेल्या आत्महत्येबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजी यांचे लग्न होऊन बरीच वर्षे झाली. मात्र मूल होत नसल्याने ते नैराश्य होते. याच मनस्तापातून त्याने आत्महत्या केली असावी अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

 belgaum

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर संभाजी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.