belgaum

अगोदरच तोट्यात असलेल्या कर्नाटक राज्य वायव्य परिवहन महामंड्ळाला (केएसआरटीसी) लॉक डाऊनमुळे रोज तब्बल 1.5 कोटी रुपयांचा फटका बसत आहे. महामंडळाच्या सुमारे दीड हजार बसगाड्या थांबून आहेत, तर 6,350 कर्मचारी घरी बसून असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

bg

देशव्यापी लोक डाऊनमुळे गेल्या 22 मार्चपासून बेळगाव आणि चिकोडी विभागातील बस सेवा बंद करण्यात आली आहे. बेळगाव विभागातून रोज 721 तर चिकोडी विभागातून 632 बसगाड्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा राज्यात धावत असतात. तथापि लाॅक डाऊनमुळे 22 मार्चपासून या बससेवा पूर्णपणे थांबविण्यात आल्या आहेत.

बेळगाव विभागाच्या 721 बसगाड्या बंद असल्यामुळे दररोज 75 लाखांचा फटका बेळगाव बस आगाराला सहन करावा लागत आहे. बेळगाव विभागामध्ये 3,450 कर्मचारी कार्य करतात. चिकोडी विभागामध्ये 632 बस गाड्या रोज धावतात. तथापि लॉक डाऊनमुळे रोज 55 लाख रुपयांचा तोटा होत आहे. चिकोडी विभागात 2,900 कर्मचारी काम करतात. एकंदर बेळगाव जिल्ह्यातील परिवहन विभागाला या 21 दिवसांच्या लॉक डाऊन कालावधीत तब्बल 32 कोटींचा फटका बसणार आहे. परिवहन विभागाच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके दिवस बससेवा बंद असल्याचे सांगण्यात येत आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.