Friday, March 29, 2024

/

लॉक डाऊनमुळे कॅन्टीन चालक बनला भाजीविक्रेता

 belgaum

खाद्याचे नशीबच खराब असेल तर त्याच्यावर एकावर एक संकटे कोसळतच असतात असे म्हंटले जाते. अशाच दुर्देवी लोकांपैकी शहापूरचे वीटनाळ सुणगार हे एक आहेत. ज्यांचे कॅन्टीन आणि घरदार गॅस सिलेंडर स्फोटात भस्मसात झाले. यातून सावरेपर्यंत आता कोरोना आणि पर्यायाने लॉक डाऊनच्‍या स्वरूपातील संकट कोसळल्यामुळे या बिचाऱ्या हॉटेल व्यावसायिकावर आता रस्त्यावर फिरून भाजी विकण्याची वेळ आली आहे.

गेल्या कांही वर्षापासून तेली पाटील गल्ली येथील व्यावसायिक विटनाळ शंकरराव सुणगार हे आपल्या घराच्या जागेतच कॅन्टीन चालविण्याचा व्यवसाय करत होते. तथापि दुर्दैवाने या गरीब व्यवसायिकाच्या कॅन्टीनमधील एलपीजी गॅस सिलेंडरचा एक दिवस अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत कॅन्टीनमधील सर्व साहित्यासह घरातील साहित्य देखील जळून खाक झाली. परिणामी सुणगार कुटुंबियांवर आभाळ कोसळून ते अक्षरशः रस्त्यावर आले होते. गेल्या 2019 मध्ये घडलेल्या या दुर्घटनेत विटनाळ सुणगार आणि कुटुंबियांच्या कपड्यालत्त्यासह रेशन कार्ड, आधार कार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे, दागदागिने, रोख रक्कम आदी सर्व ऐवज बेचिराख झाला होता.

सिलेंडर स्फोटाच्या दुर्घटनेनंतर मी पूर्णपणे खचून गेलो होतो. परंतु माझी पत्नी, मुलगा आणि दोन मुलींनी मला धीर दिला आणि कोसळलेल्या आर्थिक संकटावर मात करून पुन्हा आत्मविश्वासाने उभे राहण्यास मदत केली, असे सुणगार सांगतात. कुटुंबियांच्या भक्कम आधाराच्या जोरावर आपण पुन्हा अनेक अडचणींना तोंड देत कर्ज काढून शहापूर शिवाजी उद्यानासमोर भाड्याच्या जागेत पुन्हा कॅंटीन सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले. डोसा, इडली आणि अन्य दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ बनविण्यात विटनाळ सुणगार यांचा हातखंडा आहे. उत्तम प्रकारचे रुचकर दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ बनवणारे कॅन्टीन चालक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

 belgaum
Canteen vegetable saler
कॅन्टीन चालक कुटुंब बनलं भाजी विक्रेते

शहापूर शिवाजी उद्यानासमोर कॅन्टीन सुरू करून अलीकडेच त्यांनी कर्जफेड करण्यास सुरुवात केली होती. परंतु आता कोरोना विषाणूच्या स्वरूपात त्यांच्यावर पुन्हा संकट कोसळले आहे. लॉक डाऊनमुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून कॅन्टीन बंद असल्यामुळे सुणगार कुटुंबियांसमोर पुन्हा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रारंभी करण्याचे संकट लवकर टळेल आणि आपण आपला व्यवसाय पुन्हा सुरू करू असे विटनाळ सुणगार यांना वाटत होते. परंतु कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असल्यामुळे पुन्हा कॅंटीन सुरू करण्याच्या सुणगार यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

परिणामी अर्थार्जनासाठी अन्य कोणताच पर्याय नसल्यामुळे शेवटी सुणगार यांनी आपल्या व्हॅनमधून रस्त्यावर फिरून भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी देखील आम्हाला सहकार्य करून दिवसातील ठराविक काळात भाजी विक्री करण्याची परवानगी दिली असून त्यामुळे आमचे जगणे थोडे सुसह्य झाले असल्याचे विटनाळ सुणगार यांनी स्पष्ट केले. हा आहे हॉटेल व्यवसायिक ते भाजीविक्रेता होण्यापर्यंतचा विटनाळ सुणगार यांचा प्रवास.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.