Friday, March 29, 2024

/

बेळगावात ते 75 जण कुठे रहातात याची यादी सरकारने केली प्रसिद्ध

 belgaum

कोरोना” संदर्भात कोणताही धोका पत्करायचा नाही असा निर्धार केलेल्या कर्नाटक सरकारने आता बेळगाव जिल्ह्यातील अनेक भागातील होम काॅरंटाईन (घरात अलग ठवलेल्या) वव्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये विदेशात जाऊन आलेल्या तब्बल 75 जणांचा समावेश आहे.

बेळगाव Live ने सदर यादी जाहीर केली असून नागरिकांना ही यादी. https://karunadu.karnataka.gov.in/hfw/kannada/Pages/distwise-home-quarantive.asp

 

 belgaum

List of Home Quarantine people in Belgaum

 


 

या लिंकवरून डाऊनलोड करून घेता येईल. सदर यादीत 14 दिवसांचे होम काॅरंटाईन असलेल्या सर्व व्यक्तींचे पत्ते आहेत. सदर यादी तपासून आपल्या अपार्टमेंट अथवा घराशेजारील एखादी व्यक्ती होम काॅरंटाईन आहे का? याची माहिती नागरिकांना मिळू शकते. ती व्यक्ती कोणत्या विदेशात कधी गेलेली परत कधी आलो त्याचा उल्लेख आहे.

Corona virus
Corona virus

होम काॅरंटाईन असलेल्या व्यक्तींवर त्यांचा होम काॅरंटाईन कालावधी केंव्हा समाप्त होतो याचा स्टॅम्प अर्थात शिक्का मारण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती दिलेल्या निर्धारित कालावधीत होम काॅरंटाईनच राहील यासाठी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सहकार्य करावे. होम काॅरंटाईन व्यक्ती जेवढी घरात राहील तेवढे आपण कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहणार आहोत.

जर होम काॅरंटाईन मिळालेली व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी आढळून आल्यास कृपया 100 किंवा 104 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.