belgaum

देशभरातील लाॅक डाऊनच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संचारबंदी सदृश्य परिस्थितीमुळे नागरिकांचे जीवनावश्यक वस्तू व भावी हाल होत आहे हे लक्षात घेऊन तिला प्रशासनातर्फे रेशन आणि भाजीपाला घरपोच देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनाळी यांनी बुधवारी दिली.

bg

जिल्हाधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे बुधवारी सायंकाळी ही माहिती दिली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर देशभरात येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी सर्वसामान्य नागरिकांची जीवनावश्यक वस्तू अभावी मोठी गैरसोय होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला घरपोच देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. याची अंमलबजावणी सुरू होताच नागरिकांना फक्त एका दूरध्वनीवर किराणा दुकानानातून हव्या त्या जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळणार आहेत. यासाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांचे सहकार्य घेण्यात विचार सुरू आहे. त्याचप्रमाणे एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी हातगाडीवरून घरोघरी भाजी विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अनेक भाजीविक्रेते पुढे आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

शहरातील रिलायन्स, मोर, बिग बझार, डीमार्ट आदी शॉपिंग मॉल्सना देखील फक्त जीवनावश्यक किराणा मालाची विक्री करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या ठिकाणीदेखील सदर विक्री करताना ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्स अर्थात सामाजिक अंतर राखले जाईल याची काळजी घेतली जावी, अशी सक्त सूचना मॉल व्यवस्थापनाला करण्यात आली आहे.

शहरातील हॉटेल व उपग्रह खुली राहतील मात्र त्याठिकाणी बसून ग्राहकांना खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार नाही. हॉटेल व उपहारगृहातील फक्त किचन खुले राहील ज्यामुळे ग्राहकांना तेथून खाद्यपदार्थ घरपोच मागवता येतील किंवा स्वतः घेऊन घेऊन जाता येतील.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डाॅ. एस. बी. बोमनहळ्ळी यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील व्यापारी, हॉटेल मालक व भाजीविक्रेत्यांच्या उपरोक्त बाबींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.