Saturday, April 20, 2024

/

झोप न लागणे अति झोप लागणे- वाचा हेल्थ टिप्स

 belgaum

झोपेची अवस्था म्हणजे मनोशारीरिक पातळीवर शांततेची आणि सुप्त अवस्था अशी आपली समजूत असते. त्याचप्रमाणे झोप एक सलग क्रिया आहे. असेही वाटते. परंतु झोपेत असलेल्या मेंदूची क्रिया मापन केल्यावर असेच दिसते की झोपेत सुद्धा आपला मेंदू क्रियाशील असतो. स्नायू व डोळ्याच्या हालचाली होत असतात. झोपेचे दोन आरईएम व एनआरईएम हे पॅटर्न असतात.

झोप न लागणे
निद्रानाश हा एक मनोविकार आहे. काहींना सुरुवातीला झोप लागायला खूप वेळ लागतो. एकदा झोप लागली की, बर्‍यापैकी सलग झोप लागते काहींना त्यामानाने लगेच झोप लागते पण अधेमधे सारखी जाग येणे, मेंदू सतत कार्यरत रहाणे, मन बोलत रहाणे अशा गोष्टी होत राहतात. डिप्रेशन, काही मानसिक आजार अथवा मेंदूला इजा झालेल्या व्यक्ती फार गाढ झोप घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना दिवसभर फ्रेश वाटत नाही.

अति झोप
या अशा व्यक्तींना रात्री झोप तर लागतेच शिवाय दिवसासुद्धा बसल्याबसल्या कुठेही त्यांना झोप येते. या व्यक्ती सतत पेंगतच असतात. अशा व्यक्तींची क्रयशक्ती कमी असते. स्थुलपणाचा धोका असतो. शारीरिक हालचाल कमीने अनेकरोग वाढीस लागतात. अठरा तास झोपूनही फ्रेशनेस रहात नाही.

केस १-आजकाल सुचिताला रात्र येऊच नये, असे वाटते. जशी संध्याकाळ जवळ येईल तशी तिला धडकी भरायला सुरु होते. संपूर्ण रात्र कुस बदलत राहाते. थोडीशी झोप लागते न लागते लगेच जाग येते. कोणते विचार छळतात तेच कळत नाही. पण आपण अशा रितीने आजाराकडे वाटचाल करतो आहे याची मात्र जाणीव तिला झाली आहे. झोपेच्या गोळ्यांचीही तिला नंतर सवय झाली व स्ट्रॉंग गोळ्याही लागू पडेनाशा झाल्या. त्यावेळी मात्र पुष्पौषधी व होमिओपॅथी तिच्या कामी आल्या.
केस २- यशवंत त्याच्या नोकरीच्या ठिकाणीही पेंगत रहायचा. दिवसरात्र झोप आणि झोप. त्याला त्यांच्या बॉसनेही कित्येकदा ताकीद देऊन झाली. परंतु काही उपयोग नाही. यशवंतला काही व्यायाम, पुष्पौषधी व होमिओपॅथिक औषधांनी चांगला गुण आला.
लक्षणे
१. या दोन्हीही विकृती झोपेशी संबंधीत असल्याने त्यातील पहिल्या व्यक्तीस रात्र होऊच नये असे वाटते तर दुसर्‍या व्यक्तीस मात्र गडद झोप प्रिय होते.
२. झोप न झाल्यामुळे पहिल्या व्यक्तीस फ्रेश वाटत नाही तर खूप झोपल्यामुळे दुसर्‍या व्यक्तीला जडत्व येते.
३. पहिल्या प्रकारचे रुग्ण झोपेच्या गोळ्यांचे ऍडिक्ट बनतात. दुसर्‍या प्रकारच्या व्यक्ती हमखास स्थुलत्व, इतर आजार यांनासुद्धा बळी पडतात…
कारणे
१. या दोन्हीही विकृतींची कारणे मानसिक आजार-आघात आणि मेंदूतील रसायनांमध्ये दोष असू शकतात.
२. अनुवंशिकतेमुळे एका पिढीतून दुसर्‍या पिढीतही विकृती येऊ शकते.
३. औषधांचे अतिसेवनसुद्धा या विकृतींना कारणीभूत होऊ शकते.
४. इतर परिस्थितीय कारणे (कामाचा, नात्यांचा ताण, उद्धवस्त लैंगिक जीवन, अपूर्ण ध्येयपूर्ती इ.)
उपचार
www.thebachflower.com या संकेतस्थळावर २८ नंबरचे औषध झोप न लागणे व २२ नंबरचे औषध अतिझोपेसाठी उपयुक्त आहे. या प्रकारचे रुग्ण व्यवस्थित तपासून, हिस्टरी घेऊन होमिओपॅथी व पुष्पौषधी टिटमेंट दिल्याने रुग्ण पूर्ण बरा होतो.
इतर
१. प्रथमतः हा आजार आहे याचा स्वीकार करणे महत्त्वाचे असते.
२. केसस्टडी मार्फत आजाराचे कारण शोधून उपचारांची दिशा ठरवणे महत्वाचे असते.
३. सीबीटी या सायकोथेरपीचा वापर फायदेशीर ठरू शकतो.
४. मेडिटेशन/ योगा व व्यायाम यांचा चांगला परिणाम घडतो.
५. स्युझिक व ग्रुप डान्स थेरपी यांचा सुद्धा आश्चर्यकारक परिणाम साधता येतो.

डॉ. सोनाली सरनोबत, एम.डी. बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.