Thursday, April 25, 2024

/

पडझडीत घरांना नुकसान भरपाई मिळायला सुरुवात

 belgaum

बेळगाव महापूरामुळे मोठया प्रमाणात घरांची पडझड झाली होती. संपूर्ण घर पडलेल्यांना तसेच अर्थवट घर पडलेल्यांना सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली होती. मात्र अजूनही या नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. यामधील पहिला हप्ता आला आहे. आता दुसरा हप्ता लावकरच संबधितांच्या बैंक खात्यावर जमा केला जाणार आहे.

आतापर्यंत ३५८.७६ कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्येच हाहाकार माजला होता. या महापूरामध्ये जिल्ह्यातील तब्बल ४४ हजार ३१५ घरे कोसळली आहेत. यामधील काही घरे पूर्ण कोसळली तर काही घरे अर्धवट कोसळली जाहेत.

कोसळलेल्या घरांना पाच लाख रुपये जाहीर करण्यात आले होते. तर यामध्ये तीन भाग करण्यात जाले होते. अबक अशा प्रकारे सर्व्हे करुन संबंधीतांची नावे नोंद करण्यात आली होती. मात्र काही जणांनी आपले संपूर्ण घर कोसळल्यानंतरही नोंद झाली नसल्याच्या तक्रारी दिल्या आहेत. सर्व्हे योग्य प्रकारे झाला नाही अशा तक्रारी प्रत्येक तालुक्यामध्ये झाल्या आहेत.

 belgaum

घरे मजूर झालेल्यानाही आतापर्यंत केवळ एका हप्ता मिळाला असून दुसरा हप्ता देण्यास विलंब करण्यात येत आहे. दुसरा हप्ता लवकरच जमा होणार, असे आता सागण्यात येत आहे. तर काही जणाचा दुसरा हप्ता जमाही नेल्याने सागण्यात आले आहे.

असे असले तरी पावसाळगापूर्वी सर्व रक्कम दिली पाहिजे. कारण पावसाळ्यापूर्वी ही घरे बाधून पूर्ण होणे गरजेने आहे. अन्यथा येणाऱ्या पावसामध्ये अर्धवट असलेले घरही पुन्हा पडण्यानी शक्यता व्यक्त होत आहे. सध्या जिल्हयातील नुकसानग्रस्ताना ३५८ कोटी ७६ लाखा देण्यात आले आहेत. मात्र अजुनही काही रक्कम प्रलंबित आहे. पहिला हप्ता दिल्यानतर दुसरा हप्ता तातडीने जमा करण्यात आला नाही. त्यामुळे अनेक जण काम अर्धवट ठेवून त्याची वाट पाहत आहेत. याबाबत जिल्हाधिकान्याना विचारले असता दुसरा हप्ताही जमा होणार असल्याने त्यानी सागितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.