Thursday, March 28, 2024

/

कोरोना बेळगाव विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत घट

 belgaum

धोकादायक कोरोना विषाणूच्या दहशतीचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून विमान सेवेवर देखील त्याची पडसाद उमटली आहे. कोरोनाचा धसका घेतलेल्या प्रवाशांनी आता हवाई प्रवासाकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केल्यामुळे बेळगाव विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्नाटक राज्यासह देशभरात युद्ध पातळीवर उपाययोजना करून खबरदारी घेतली जात आहे. तथापि जनमानसातील कोरोना बाबतची भीती अद्यापही कायम आहे. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे आता प्रवाशांचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमान प्रवास टाळण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच बेळगावच्या सांबरा विमानतळावरही प्रवाशांची रोडावली आहे.

संपूर्ण देशभरातच धोकादायक कोरोना विषाणूची दहशत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावच्या सांबरा विमानतळावर आरोग्य खात्याच्यावतीने प्रवाशांची काटेकोर वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर संपूर्ण विमानतळ परिसराची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. विमानतळ इमारतीतील प्रवाशांच्या विश्रांतीसाठी असलेला आसन व्यवस्थेचा भाग तसेच प्रवाशांचा वर्दळीचा मार्ग रोजच्या रोज झाडून – पुसून निर्जंतुक केला जात आहे. या पद्धतीने खबरदारीच्या सर्व त्या उपाय योजना केल्या जात असतानाही कोरोनाचा धसका घेतलेल्या प्रवाशांनी हवाई सफर टाळण्याकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसून येत आहे.

 belgaum

बेळगावच्या सांबरा विमानतळावरून सध्या बेंगलोरला चार, हैदराबादला तीन, मुंबईला दोन, तर पुणे, इंदुर, अहमदाबाद, तिरुपती, कडप्पा, म्हैसूर, अजमेर या शहरांना प्रत्येकी एक अशा 15 विमान फेर्‍या सुरू आहेत. यापूर्वी सांबरा विमानतळावर ११०० ते १२०० प्रवाशांची ये – जा दिसून येत होती. मात्र गेल्या चार दिवसात प्रवाशांची संख्या ३५० ते ४०० पर्यंत खाली घसरली आहे. यामुळे बेळगाव विमानतळ प्रशासन चिंतेत पडले असून परिस्थिती पूर्वपदावर येऊन प्रवाशांची संख्या पूर्वीप्रमाणेच केंव्हा वाढणार? याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

For the convenience, the following contact numbers of all Five Airlines  belgaum air port are given below:
1) M/s. Air India/Alliance Air : 0831-2562522 or 2562422
2) M/s. Spicejet : 0831-2562009
3) M/s. Star Air : 0831-2562399
4) M/s. Indigo : 0831-2562234 5)
5)M/s. Trujet : 0831-2562188

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.