Thursday, April 25, 2024

/

बेळगाव विमानतळाने हुबळीला टाकले मागे!

 belgaum

एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या गेल्या 2019 सालच्या “ग्राहक समाधान यादी”मध्ये
भारतातील निवडक 48 विमानतळांमध्ये हुबळीला मागे टाकून बेळगाव विमानतळाने 12 वा क्रमांक पटकाविला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यास आपण किती पात्र आहोत हे देखील दाखवून दिले आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) दरवर्षी सर्वेक्षण करून प्रवाशांना समाधानकारक सेवा देणाऱ्या देशातील निवडक विमानतळांची यादी तयार करत असते. त्यानुसार गेल्यावर्षी भारतातील विमानतळांच्या जानेवारी ते जून 2019 आणि जुलै ते डिसेंबर 2019 या तुलनात्मक तिसऱ्या आणि चौथ्या सर्वेक्षण फेरीअंती देशातील निवडक 48 विमानतळांची भारतीय विमानतळ प्राधिकरणाने “ग्राहक समाधान यादी”साठी निवड केली आहे. या निवडक विमानतळांमध्ये बेळगाव ने 12वे स्थान मिळवले आहे. बेळगाव विमानतळाने तिसऱ्या फेरीत 4.55 आणि चौथ्या फेरीत 4.59 गुण मिळविले आहेत.या यादीत हुबळीला 13 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. ही ओळ दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये शेवटी टाकणे.
दरम्यान, एएआयकडून प्रवाशांना समाधानकारक सेवा देणाऱ्या विमानतळाची यादी बेळगावच्या उल्लेखासह सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच असंख्य लोकांनी ती यादी हुबळी विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळावा यासाठी पाठिंबा देणाऱ्या केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांच्या ट्विटर अकाउंटवर टाकली आहे. कारण उत्तर कर्नाटकातील कांही नेत्यांकडून हुबळी विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना बेळगावचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी अलीकडेच एका कार्यक्रमांमध्ये जाहीर वक्तव्य करून आपला पाठिंबा दर्शविला आहे. किमान आता भारतीय विमानतळ प्राधिकरणाची यादी पाहून तरी मंत्री सुरेश अंगडी यांनी आपल्या घरच्या अर्थात बेळगावच्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बेळगाव येथील सांबरा विमानतळाला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून या ठिकाणच्या विमान सेवेत ही वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्र गोवा आणि हैदराबाद या राज्यांसाठी बेळगाव विमानतळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे. तेंव्हा आवश्यक सुधारणा करून या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात यावा अशी प्रवासी आणि स्थानिक लोकांची बऱ्याच कालावधीपासूनची मागणी आहे.

Belgaum air port
Belgaum air por

ग्राहक समाधान सूचीतील देशातील पहिल्या 11 विमानतळांमध्ये वडोदरा विमानतळ (4.80, 4.79 गुण) प्रथम क्रमांकावर असून त्यामागोमाग अनुक्रमे उदयपूर, गया, मदुराई, डेहराडून, जम्मू, औरंगाबाद, जोधपुर, सुरत, अगरतला आणि भुंतर या विमानतळांचा क्रमांक लागतो. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सर्वेक्षणात एकूण 33 मापदंड पडताळून प्रवाशांना समाधानकारक सेवा देणाऱ्या विमानतळांची निवड करण्यात आली आहे. विमानतळ आणि परिसराची स्वच्छता, प्रवाशांचे सामान हलविण्याचा वेग, सुरक्षा व्यवस्था, इंटरनेट प्रणाली, ट्रॉलर सुविधा, चेक-इन सुविधा, स्वच्छतागृह, विमानतळ कर्मचाऱ्यांचे वर्तन, उपहारगृह, वायफाय सुविधा, एक्झिक्युटिव्ह लाऊज, बिझनेस लाऊज आदींचा या मापदंडांमध्ये समावेश आहे.

 belgaum

स्टार एअरसह इंडिगो, ट्रू जेट आदी विमान कंपन्यांनी गेल्या वर्षभरापासून बेळगाव सांबरा विमानतळामध्ये रस दाखविण्यास सुरुवात केली आहे. या कंपन्यांना याठिकाणी प्रवाशांचा प्रतिसादही उत्तम मिळत आहे. स्टार एअर कंपनीने तर बेळगाव ते अजमेर (राजस्थान) ही आपली नवी विमानसेवा नुकतीच सुरु केली आहे. दक्षिण कर्नाटकसह आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व गोवा येथील प्रवाशांसाठी बेळगाव विमानतळ मध्यवर्ती पडते. त्यामुळे अलीकडच्या काळात या विमानतळाला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणच्या विमान फेऱ्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

आता प्रवाशांना समाधानकारक सेवा देणाऱ्या देशातील निवडक 48 विमानतळांमध्ये बेळगावने चक्क 12 वा क्रमांक पटकावल्यामुळे या विमानतळाचे महत्त्व आणखी वाढले आहे. याचे संपूर्ण श्रेय बेळगाव विमानतळाचे कर्तव्यदक्ष आणि कल्पक संचालक राजेशकुमार मौर्य यांना जाते. बेळगाव विमानतळावर प्रवाशांच्या बाबतीत मैत्रीपूर्ण वातावरण राहावे यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. या अनुषंगाने आपले कौशल्य दाखवून प्रवाशांचे मनोरंजन करण्यासाठी कांही स्थानिक कलाकारांना विमानतळ टर्मिनलमध्ये आपली कला सादर करण्याची संधी राजेशकुमार मौर्य यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.