belgaum

बेंगळुरू–मुंबई वंदे भारत स्लीपर हुबळी, बेळगाव मार्गे चालवण्याची शेट्टर यांची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बेंगळुरू–मुंबई वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस हुबळी, बेळगाव मार्गे सुरू करण्याची मागणी केली आहे. या मार्गामुळे उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रवाशांना जलद, आरामदायी आणि रात्रीच्या प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

पीटीआयशी बोलताना शेट्टर यांनी सांगितले की, प्रस्तावित मार्गामुळे हुबळी, बेळगाव तसेच परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होईल. बेंगळुरू आणि मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान व सोयीस्कर होईल.

दरम्यान, एप्रिल २०२६ मध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बेंगळुरू–मुंबई वंदे भारत स्लीपर रेल्वे कलबुर्गी मार्गे सुरू करण्याचा प्रस्ताव जाहीर केला होता. या मार्गावरील प्रवासाचा कालावधी सुमारे १६ तास असेल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.

 belgaum

मात्र, आता खासदार जगदीश शेट्टर यांनी कलबुर्गीऐवजी हुबळी, बेळगाव मार्गे वंदे भारत स्लीपर सुरू करण्याची मागणी करत दक्षिण पश्चिम रेल्वेच्या या महत्त्वाच्या मार्गालाही प्राधान्य देण्याची विनंती केली आहे.

सध्या हुबळी, बेळगाव मार्गे वंदे भारत स्लीपर रेल्वेला कोणतीही अधिकृत मंजुरी मिळालेली नाही. अंतिम मार्गाबाबत रेल्वे मंत्रालयाकडून निर्णय होणे बाकी असून, उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रवाशांचे लक्ष आता या निर्णयाकडे लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.