Friday, March 29, 2024

/

जुलै पासून विमान तळावर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम

 belgaum

धुकं पाऊस आणि खराब हवामानात देखील बेळगाव विमान तळावर विमानाचे लँडिंग होण्यास मदत होणार आहे कारण या विमान तळाला अत्याधुनिक बनवून आय एल एस(instrument landing system) ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आगामी जुलै 2020 महिन्या पासून ही सिस्टम बेळगाव विमान तळावर सुरू होणार आहे.
या यंत्रणेमुळे विमानाच्या कॉकपीटमध्ये विमान उतरविण्यासाठी दोन अँटेनाद्वारे रेडिओ सिग्नल पाठवले जातात.त्यामुळे पुरेसा प्रकाश नसताना किंवा हवामान खराब असताना देखील वैमानिकाला विमानाचे लँडिंग करणे सहज शक्य होणार आहे.ही यंत्रणा स्थापन करण्यासाठी काम युद्धपातळीवर सुरू आहे.या यंत्रणेचा वापर केवळ विमान लँडिंग करण्यासाठी केला जातो.

Ils system air port
Ils system air port

बेळगाव विमानतळाची एका वर्षात चारशे टक्के वृद्धी झाली आहे.उडाण योजनेत अनेक नवे मार्ग सुरू करण्यात आले असून आता लवकरच त्रुजेट तिरुपती,कोल्हापूर आणि अन्य ठिकाणी सेवा सुरू करणार आहे.प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादामुळे नव्या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात येत आहे.

 belgaum

आय एल एस ही अशी सिस्टम विमान तळावर असल्याने धुकं,पाऊस आणि खराब हवामान असले तरी विमान लँडिंग होऊ शकणार आहे. तब्बल सात कोटी खर्चून ही सुविधा बेळगाव विमान तळावर बसवून अत्याधुनिक केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.