Thursday, April 25, 2024

/

बेळगाव – हैदराबाद विमान सेवेला का आहे वाढती मागणी

 belgaum

सध्या बेळगाव विमानतळावरून बेळगाव – हैदराबाद विमानाच्या दररोज तीन फेऱ्या होत असून या तीनही फेऱ्यांना प्रवाशांची गर्दी होत आहे. जवळपास हैदराबाद इतक्याच विमान फेऱ्या बेंगलोरलाही होतात परंतु हैदराबादच्या विमानांनाच गर्दी का? याची उत्सुकता नागरिकांना आहे.

बेळगाव हैदराबाद डिसेंबर महिन्यात दोन फेऱ्या होत्या जानेवारी पासून तीन झालेत मुंबई बेळगाव दरम्यान दोन फेऱ्या आहेत मात्र हैदराबाद ला  ये जा करणाऱ्यांची संख्या मुंबई पेक्षा अधिक आहे. ,मागील डिसेंबर महिन्यात हैदराबाद : प्रस्थान 3553, आगमन 3343. मुबई : प्रस्थान 3188, आगमन 3205 आहेत.

सध्या स्टार एअर, स्पाइस जेट आणि ट्रू जेट एअरलाइन्सकडून बेळगाव ते हैदराबाद अशी थेट विमान सेवा दिली जात आहे. बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगलोर इतक्याच विमानाच्या फेऱ्या हैदराबादलाही सुरू आहेत. बेळगाव विमानतळावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्वच विमानांना प्रवाशांची गर्दी होत आहे. दरम्यान, हैदराबादच्या विमानांना ज्यादा गर्दी का होते याचे कारण जाणून घेण्यासाठी कांही व्यावसायिक मंडळींची भेट घेतली असता हैदराबाद हे व्यापार धंद्यासाठीचे मोठे शहर असण्याबरोबरच बेंगलोर प्रमाणे माहिती तंत्रज्ञानाचे (आयटी हब) मोठे केंद्र आहे. तसेच बेळगाव जिल्ह्याचा हैदराबादशी जुना व्यापारी संबंध आहे. शिवाय अन्य शहरांच्या विमानसेवा या सेवेशी संलग्न असल्याने बहुसंख्य नागरिक बेळगाव – हैदराबाद विमानसेवेला पसंती देत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रालय आणि रायचूर येथे जाण्यासाठी कांही प्रवाशी या विमान सेवेचा पर्याय वापरत आहेत.

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात आणि आसपास हैदराबादच्या रेड्डी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी बेळगाव ते हैदराबाद विमान सेवा अत्यंत सोयीची झाली आहे. शिवाय आरोग्य सेवा खास करून छाती आणि यकृत (लिव्हर) विकाराशी संबंधित रामबाण उपचारासाठी हैदराबाद सुप्रसिद्ध आहे. त्यामुळे रुग्णांची मोठ्या संख्येने हैदराबादला ये-जा असते, हे देखील बेळगाव – हैदराबाद विमानाच्या गर्दीचे कारण आहे. याव्यतिरिक्त रामोजी राव फिल्मसिटी आणि इतर अनेक प्रेक्षणीय स्थळे असणारे हैदराबाद हे देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ देखील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.