Saturday, April 27, 2024

/

महाराष्ट्र मैदानाची ठरली तारीख…

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध आलेले कुस्तीचे मैदान म्हणजे महाराष्ट्र मैदान…यावर्षीची महाराष्ट्र मैदानातील दंगलीचा मुहुर्त ठरला आहे.

येळ्ळूर गावची ग्राम देवता चांगळेश्वरी देवी यात्रे निमित्त महाराष्ट्र मैदान भरत असते दरवर्षी 50 हजार हुन अधिक कुस्ती शौकींन या मैदानात गर्दी करत करत असतात.

येळ्ळूर गावाची यात्रा 13 एप्रिल पासून सुरु होणार आहे. सोमवार दि.13 एप्रिल 2020 रोजी आंबील गाडे मंगळवारी14 रोजी चांगळेश्वरी व कलमेश्वर मंदिर समोर इंगळ्या बुधवार दि.15 रोजी श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस गुरुवार 16 रोजी महाराष्ट्र मैदान येळ्ळूर येथे कुस्ती असा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे.केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना कुस्ती मैदानाचे खास आमंत्रण देण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.