जखमी तसेच अनेक ठिकाणी अडकलेल्या मुक्या प्राण्यांना जीवदान देणाऱ्या बावा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कौतुकास्पद कार्य केले आहे.
कार्यकर्त्यांनी वडगाव येथे विहिरीत पडलेल्या कुत्र्याला अग्निशामक दलाच्या साहाय्याने बाहेर काढून जीवदान दिले.नंतर पुन्हा त्या विहिरीत कुत्रे,मांजर पडू नये म्हणून बावाच्या कार्यकर्त्यांनी विहिरीवर पत्रे घालून झाकली.
![Bawa](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/01/IMG-20200130-WA0470.jpg)
नंतर शहापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.त्यांना शहापुरचे पोलीस इन्स्पेक्टर राघवेंद्र यांनी प्रतिसाद दिला.लगेच विहिरीच्या मालकाला बोलवून विहिरीवर झाकण्यासंबंधी सूचना केली.
राघवेंद्र यांनी दाखवलेल्या तत्परते बद्दल बावाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन धन्यवाद दिले.आज बेळगाव शहरात सरकारच्या चुकीने रस्तेअपघात होऊन माणसांचे जीव गेल्याचा घटना घडताहेत सरकार रस्ते दुरुस्त करण्यास जेवढी तत्पुरता दाखवत नाही त्याहून अधिक मुक्या प्राण्यांच्या साठी बावा संघटनेच्या माध्यमातून तत्परतेने कार्य होताना दिसत आहे.