Friday, April 26, 2024

/

‘ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा’

 belgaum

सापडलेला मोबाईल सुखरूप परत करत ऑटो चालकाने प्रामाणिकपणा दाखवला आहे.शंकर राजगोळकर असे या प्रामाणिक ऑटो चालकाचे नाव असून या प्रामाणिक पणा बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बुधवारी दुपारी रामदेव हॉटेल जवळ हेस्कॉमचे निवृत्त कर्मचारी बर्नर गोंचालवीस यांचा मोबाईल हरवला होता तो रस्त्यात पडलेला मोबाईल ऑटो चालकाने ए पी एम सी पोलिसांच्या स्वाधीन केला.

Sincere auto driver
Sincere auto driver belgaum

त्यावर पोलीस निरीक्षक जावेद यांनी गोंचालवीस यांना पोलिस स्थानकात बोलावून सदर मोबाईल ऑटो चालकाच्या हस्ते परत केला.

 belgaum

एकीकडे बेळगाव शहरात प्रवाश्यांकडून दुप्पट भाडे वसूल करणारे ऑटो चालक भरले असताना मोबाईल परत करत प्रामाणिकपणा जपणारे रिक्षा चालक देखील कमी नाहीत.मोबाईल परत करत प्रामाणिक पणा दाखवणाऱ्या रिक्षा चालकाचे कौतुक पोलीस निरीक्षक जावेद यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.