Friday, April 26, 2024

/

राकसकोप जलाशय काठांवरील नुकसानग्रस्त पिकांचा पंचानामा

 belgaum

यंदाच्या पावसाळ्यात धोक्याची पातळी ओलांडलेल्या राकसकोप जलाशयाच्या पाण्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा मंगळवारी चंदगड महसूल खात्यातर्फे करण्यात आला.

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाण्याने यंदाच्या पावसाळ्यात धोक्याची पातळी ओलांडली, परिणामी जलाशय परिसरातील पिके पाण्याखाली गेली. यामुळे राकसकोप परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आपल्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी या शेतकऱ्यांनी गेल्या 25 नोव्हेंबर रोजी चंदगड तहसील कार्यालयावर मोर्चा मोर्चा काढला होता. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्यावतीने मंगळवारी चंदगड महसूल खात्याकडून राकसकोप जलाशयाच्या पाण्याखाली गेलेल्या पिकांचा पंचनामा करण्यात आला. जलाशयाच्या मुख्य दरवाजापासून पाहणीला सुरुवात करून हा पंचनामा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही राकसकोप जलाशयाचे पाणी धोक्याच्या पातळीपेक्षा सुमारे अडीच ते तीन फूट वाढले होते. त्यामुळे जलाशय काठावरील पिके पाण्याखाली गेल्याने त्यांचे नुकसान झाले.

नुकसानग्रस्त पिकांमध्ये भात, रताळी, ऊस, नाचणा आदी पिकांचा समावेश आहे. गेल्या 2014 पासून दरवर्षी राकसकोप जलाशयाचे प्पाणी धोक्याची पातळी ओलांडून जलाशय काठच्या पिकाऊ जमिनीत पसरत असते. यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत वेळोवेळी आवाज उठवूनही त्याची दखल घेतली जात नाही. यंदादेखील पिकांचे नुकसान झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी 25 नोव्हेंबर रोजी चंदगड तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले, तसेच नुकसानभरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. दरम्यान मंगळवारी चंदगड तहसीलदार व सर्कल यांनी राकसकोप जलाशय काठावरील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामा केला.

 belgaum

त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपला लढा कायम सुरूच राहील असे सांगितले. त्याचप्रमाणे आपल्या पिकांची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणीही ही त्यांनी तहसीलदारांकडे केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.