Saturday, April 20, 2024

/

सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलची साहसी मोहीम

 belgaum

साहसी मोहिमेअंतर्गत सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या 35 वायु सैनिकांनी बेळगाव ते गोकाक गोडचीनमलकी हा प्रवास सायकलवरून पूर्ण केला.
हवाईदलाच्या सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलने साहसी मोहिमेअंतर्गत बेळगाव ते गोकाक गोडचीनमलकी अशा सायकल प्रवासाचे आयोजन केले होते.

सदर साहसी मोहिमेत ट्रेनिंग सेंटरच्या 35 जवानांनी भाग घेतला होता. हवाई दलाचे अधिकारी एअर कमोडोर आर रविशंकर यांनी ध्वज दाखवून या मोहिमेचा शुभारंभ केला. याप्रसंगी निमंत्रितांसह हवाईदलाचे अन्य अधिकारी आणि जवान उपस्थित होते.

यावेळी पाहुण्यांचे समयोचित भाषण झाले. प्रत्येकाने सुदृढ राहणे महत्वाचे हा संदेश देणे हा या साहसी मोहिमेचा मुख्य हेतू होता.सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या 35 जवानांनी ही सायकलिंग मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.