Thursday, March 28, 2024

/

बहाद्दरवाडीत गोवा बनावटीची दारू जप्त

 belgaum

बेकायदेशीर रित्या घरात विक्री साठी ठेवलेल्या बहाद्दरवाडी येथील एकास अटक करण्यात आली असून त्याच्या जवळील 28 हजार किंमतीची विविध नमुन्यांची दारू जप्त करण्यात आली आहे.

लक्ष्मण सातेरी पाटील वय 50 रा. घर नंबर 314 ब्रह्मलिंग गल्ली बहाद्दरवाडी असे घरात बेकायदेशीर रित्या चोरून गोवा बनावटीची दारू विकणाऱ्याचे नाव आहे.

सी सी आय बी पोलिसांनी गोवा बनावटीची दारू साठवून ठेवल्याची माहिती मिळताच बहाद्दरवाडी येथील लक्ष्मण यांच्या घरी धाड टाकत106 लिटर व्हिस्की रम व्होडका दारू जप्त केली. जप्त केलेल्या दारूची किंमत 28072 आहे.

 belgaum

सी सी आय बी ए सी पी महंतेश जेद्दी, पोलिस निरीक्षक संजीव कांबळे आदींनी ही कारवाई केली आहे.बेळगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.अलीकडे गोव्याहून बेळगावात आणून दारू विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.