Saturday, April 27, 2024

/

‘विमानतळा वरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ’

 belgaum

एकेकाळी बेळगाव विमानतळ कोठे आहे हे अनेकांना माहीतच नव्हते. मात्र आता एका नव्या रूपात आणि नव्या दमात बेळगाव येथील सांबारा विमानतळाने मोठे झेप घेतले आहे. जवळपास डिसेंबर पर्यंत दीड लाख प्रवासी प्रवास करतील असा विश्वास सांबरा विमानतळातील अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे बेळगाव येथील प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.

मे महिन्या पासून ते सप्टेंबर महिन्याअखेर पर्यंत सुमारे एक लाख पंधरा हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे सांबरा विमानतळाचे लक्ष देशभरात दिसू लागली आहे. विमानात बसणे हे काही वर्षांपूर्वी अनेकांचे स्वप्न होते मात्र उडान योजनेअंतर्गत अनेकांचे ते स्वप्न पूर्ण करता येत आहे. त्यामुळे अनेकजण अधिकतर लांबचा प्रवास विमानानेच करत असल्याचे उघडकीस येत आहे.

कमी वेळेत जाऊन पोहोचायचे असेल तर विमान हा चांगला पर्याय बनला आहे. बेळगाव विमानतळावरून महिन्याला पाचशे उड्डाण व लँडिंग होत आहे. त्याचबरोबर सांबरा येथे येण्यासाठी कर्नाटक परिवहन महामंडळाने बसची सोय देखील केली आहे. त्यामुळे अनेकांना ही सोयीचे ठरत असून अधिक प्रवासी आता विमान सेवेकडे वळले आहेत.

 belgaum

गोवा महाराष्ट्र कर्नाटक मध्यावर असलेल्या बेळगाव शहराची व्याप्ती आता वाढू लागली आहे. बेळगावात असणारे औद्योगिक वसाहत सध्या विमानसेवेला पोषक वातावरण निर्माण करून देणारी ठरत आहे. त्यामुळेच प्रवाशांची संख्या वाढत असून मध्य प्रदेश राजस्थान हैदराबाद आदी ठिकाणी विमानाने प्रवास करतात. त्यामुळे आता देशाच्या राजधानीकडे विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती मिळाली आहे. बेळगावचे सांबरा विमानतळ आता अनेकांना लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. त्यामुळे देशाचे प्रमुख विमानतळ म्हणून बेळगाव येथील सांबारा विमानतळाकडे पाहिले जात आहे.

सप्टेंबर या एकाच महिन्यात 21 हजार तर ऑक्टोबर मध्ये 26 हजार हुन अधिक प्रवासी विमान तळावरून प्रवास केलाय आगामी डिसेंम्बर महिन्यात हा आकडा 30 हजार पार होईल अशी शक्यता विमान तळ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.