Friday, April 26, 2024

/

उप नोंदणी कार्यालयावर आता सीसीटीव्हीची नजर

 belgaum

मागील पंधरा ते वीस दिवसापासून उप नोंदणी कार्यालयाचा भ्रष्टाचार उघडकीस येत आहे. यामुळे अनेकांना याचा फटका सहन करावा लागला तरी अधिकाऱ्यांच्या पैसेखाऊ वृत्तीमुळेच सारा गोंधळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत असून आता या कार्यालयावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. त्यामुळे होणारा भ्रष्टाचार कमी होईल अशी आशा सर्वांना लागून आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी या कार्यालयात सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची चांगलीच गोची होणार आहे. उप नोंदनी कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरणच होते. यामुळे येथे येणारे अधिकारी बक्कळ माया जमून धनधाकड व्हायचे. नागरिकांचे मात्र पिळवणूक होत होती. या सार्‍या प्रकारावर चाप बसविण्यासाठी आता या कार्यालयात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

Cctv camera
File image cctv camera

दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमाई मुळेच अनेक वाद निर्माण झाले होते. हा वाद मिटविण्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. या परिस्थितीत नागरिकांचे मात्र हाल झाले आहेत. उप नोंदनी कार्यालय म्हणजे पैसे कमवण्याचे माध्यम बनले आहे. दोन अधिकाऱ्यांच्या चढाओढी मुळे अनेकांना फटका बसला आहे. अशा परिस्थितीत काहींची बदली करण्यात आली तर आणखी काही ची बदली होणार होती. मात्र काही नेत्यांनी यात सहभाग घेऊन बदली रोखण्याचे ही सामोरी आली आहे.

 belgaum

उप नोंदणी कार्यालयात झालेल्या कारभारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत होता. अशा परिस्थितीत जे पैसे देईल त्याचे पहिला काम अशी परिस्थिती तेथे निर्माण झाली होती. त्यामुळे वारंवार सर्वर डाऊनचे कारण पुढे करून अनेक अधिकारी पैसे कामविण्यातच धन्यता मानत होते. हा सारा प्रकार रोखण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. या कार्यालयात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून साऱ्यांच्या कारभाराचा लेखा चिठ्ठा या सीसीटीव्हीत कैद होणार आहे. एजंटांचे कारनामे थांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.