Thursday, April 25, 2024

/

ना मला नं तुला घाल कुत्र्याला

 belgaum

बेळगावातील उप नोंदणी कार्यालय म्हणजे नागरिकांना त्रासदायक ठरू लागले आहे. केवळ पैसे कमावण्यासाठी हे कार्यालय असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नोंदणी कार्यालयातील कर्मचारी एजंट बरोबर साटेलोटे करून आपला खिसा गरम करून घेण्यावर भर देत असतात. त्यामुळे गरीब जनतेला मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सध्या उप नोंदणी कार्यालयात दोन वरिष्ठ अधिकारी नेमण्यात आल्याने पैसे खाण्यासाठी त्यांची चढाओढ सुरू असते. त्यामुळे ना मला ना तुला घाल कुत्र्याला अशी अवस्था या रजिस्टरची झाली आहे.

नुकतीच या सब रजिस्टर कार्यालय मध्ये कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याबद्दल एका वकिलाने ही तक्रार केली आहे. मात्र याचे सोयरसुतक नसल्याने उप नोंदणी कार्यालयातील अधिकारी मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे अनेक आतून संताप व्यक्त होत असून याबाबत तातडीने संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Sub registrar
Sub registrar

उप नोंदणी कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला असून यामध्ये वरिष्ठ अधिकारीही सामील आहेत. पैसे द्या आणि कामे करून घ्या अशीच येथील परिस्थिती आहे. त्यामुळे दररोज लाखोंची उलाढाल केवळ आणि केवळ अधिकाऱ्यांकडे होत असते तर इतरांचे काय हा प्रश्न अंतर्मुख करणारा आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांपासून चपराशाच्या पर्यंत साऱ्यांनाच पैशांची हाव लागले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 belgaum

ज्यांना आपली कामे करून घ्यायचे आहेत त्यांनी एजंटांकडून यावे असे अधिकारी सांगत असतात. त्यामुळे एजंटांनी नोंदणी कार्यालय गजबत असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. थेट धिकार्‍यांकडे गेल्यास हे काम होत नाही असे सांगून नागरिकांची दिशाभूल करुन एजंटांकडून आला तर बरे झाले असते असे सांगण्यात येते. त्यामुळे नागरिक हतबल झाले असून या अधिकार्‍यांवर चाप घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. येथील भ्रष्टाचार थांबल्यास अनेकांचे दृष्टीने सोयीचे ठरणार असून येथील गहाळ होणारे पेपर एजंटांनी घेतले नसतील कशावर असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.