Friday, March 29, 2024

/

बेपत्ता मुलीचा मृतदेह कपाटात सापडला,घर मालकाची देखील आत्महत्या

 belgaum

निपाणी जवळील कोडणी गावात एका घरातील कपाटात चार वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली असून मृतदेह सापडलेल्या घराच्या मालकाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून कपाटात मृतदेह सापडलेली मुलगी 22 तारखेपासून बेपत्ता होती.पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली होती.पोलीस आणि मुलीचे कुटुंबीय बेपत्ता मुलीचा शोध घेत होते.कपाटात सापडलेला मुलीचा मृतदेह सडण्यास प्रारंभ झाला होता.घर मालकाने त्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला मारून कपाटात लपवल्याचा संशय व्यक्त केला आहे.निपाणी ग्रामीण पोलिसांनी आज सकाळी आजूबाजूच्या लोकांनी दरवाजा घराचा आज उघडला नाही म्हणून पोलिसांना कळवले.

पोलिसांनी तेथे दाखल होऊन दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.त्यावेळी त्यांना घर मालकाचा मृतदेह लटकत असल्याचे दिसून आले.घरात शोध घेतला असता कपाटात चार वार्षच्या मुलीचा सडण्यास सुरू झालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

 belgaum

घर मालक 54 वर्षाचा असून त्याच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून त्याची दोन मुले बेळगावात शिकत आहेत.पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेम साठी बेळगावला पाठवले असून घर मालकाचा मृतदेह अंत्यविधीसाठी गावात आणण्यास नागरिकांनी विरोध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.