Wednesday, April 24, 2024

/

लेंडी नाल्याचा चेंडू मनपाच्या कोर्टात

 belgaum

तीनशे एकर मधील पिके खराब झाली असून शहरातील लेंडी नाला मुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. लोकवर्गणीतून लेंडी लावण्याचे काम सुरू करण्यात आले असले तरी प्रशासनाने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. लघुपाटबंधारे खात्याने याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. मात्र हा नाला आपल्या हद्दीत येत नसून महानगरपालिकेच्या हद्दीत येतो असे सांगून हात झटकण्याचा प्रकार केला आहे.

लोकवर्गणी आणि एपीएमसी सदस्य तसेच लोकप्रतिनिधीच्या सहकार्यातून फुटलेला कालवा बुजविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या नाण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, सुनील जाधव यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी लघुपाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपली समस्या मांडली. मात्र अधिकाऱ्यांनी मनपाकडे बोट करून हा झटकण्याचा प्रकार केला आहे.

मंगळवारी शेतकरी नेते नारायण सावंत यांनी मनपा अभियंता आर एस कुलकर्णी यांची भेट घेऊन लेंडी नाला दुरुस्त करा कायम स्वरूपी पुनर बांधणी करा अशी मागणी केली.

 belgaum
Lendi nala
Lendi nala

लघु पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी हा नाला आपल्याकडे येत नसून महानगरपालिकेकडे येतो असे सांगितले आहे. मात्र याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी विचारले असता आम्हाला तसे कोणतेही पत्र आले नाही असे सांगून हात झटकत आहेत. त्यामुळे अडचणीत अडकलेले शेतकरी कुणाकडे पहावे असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

नाला मोठ्या प्रमाणात फुटल्यामुळे मागील आठ दिवसापासून त्यामध्ये माती टाकण्याचे काम सुरू आहे. कुडची परिसरातून नाल्याचे रुंदीकरण करावे आणि पाण्याचा निचरा होईल याबाबत सर्वे करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.