गोगटे सर्कल जवळील बसवेश्वर उड्डाण पूल दुरुस्तीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.रेल्वे खात्याने या पुलाचे उदघाटन 25 डिसेंबर 2018 रोजी केले होते.पण वर्षाच्या आतच उड्डाण पूल दुरुस्तीसाठी काही काळ बंद ठेवण्याची नामुष्की रेल्वे खात्यावर ओढवली आहे.
उदघाटन झाल्यापासून काही दिवसातच उड्डाण पूल दोन ठिकाणी खचला होता.तेथे थातूर मातूर दुरुस्ती करून वेळ मारून नेण्यात आली.पण आता उड्डाण पुलावर दोनहुन अधिक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलाच्या मध्यभागी हे खड्डे असल्यामुळे उड्डाण पुलाच्या दर्जाबाबतच शंका जनता उपस्थित करत आहे.यापूर्वीचा उड्डाणपूल ब्रिटिश कंपनीने उभारला होता.
बेळगाव Live ने देखील सदर उड्डाण पुलाची दुरुस्ती झाली पाहिजे या मागणी अनेकदा बातम्या प्रसारित केल्या होत्या आमदार बेनके यांनी देखील मागील आठवड्यात पहाणी केली होती त्यानुसार आता या उड्डाण पुलाची दुरुस्ती होणार आहे.खचलेला रस्ता उड्डाण पुला वरचा धक्का बुजवला जाणार आहे.
हा पूल पाडवेपर्यंत एकशे दहा वर्षे पुलाला काही झाले नव्हते पण नव्या उड्डाण पुलाचे मात्र तीनतेरा वाजले आहेत.कोट्यवधी रुपये खर्च पुलासाठी करून वर्षाहून अधीक काळ काम चालले होते.नागरिकांना त्याचा मनस्ताप देखील झाला होता .आता रेल्वे खात्याने पोलीस खात्याकडे उड्डाण पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पत्र लिहिले आहे.त्यामुळे आता काही दिवस एका मार्गावरूनच वाहतूक सुरू राहणार आहे.