Thursday, March 28, 2024

/

‘शेतकऱ्याची कन्या मिस वर्ल्ड सुपर मॉडेल’

 belgaum

रयत गल्ली वडगाव ची कुमारी स्नेहल राजेंद्र बिर्जे हिने बँकॉक येथे नुकत्याच झालेल्या फॅशन स्पर्धेत भाग घेऊन सौंदर्याचे 3 किताब पटकावले. त्यामध्ये ‘वर्ल्ड सुपर मॉडेल अशिया 2019’, मिस वर्ल्ड सुपर मॉडेल आणि मिस काँजेंनीयलिटी थायलँड, अशा तीन पुरस्कारांचा समावेश आहे.

बेळगावची मान उंचावणारी कुमारी स्नेहल ही 21 वर्षीय तरुणी सध्या धारवाडच्या एसडीएम सी ई टी एम बी ए कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत आहे. वयाच्या 18 व्या वर्षापासून तिला मॉडेलिंग ची आवड आहे ‘आपण आपले नाव करावे’ या जिद्दीने तिने या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करून मंगलोर येथे झालेल्या ऑडिशनमध्ये भाग घेतला. आणि तिची इतर पाच तरुणीबरोबर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली.

Snehal birje
स्नेहल बिरजे

जगाच्या विविध भागातून 25 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.त्या सर्वांवर मात करून स्नेहल ने हे मानाचे तीन पुरस्कार पटकावले .स्नेहल चे वडील हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांनीच या स्पर्धेसाठी लागणारा तिचा ड्रेस बनविला होता ज्याचे अनेकांनी कौतुक केले .

 belgaum

कुमारी स्नेहल ही सध्या रयत गल्ली वडगाव येथे राहत असून बेंगलोरच्या सिल्व्हर स्टार स्टुडिओमध्ये तिला मॉडेलिंग चे प्रशिक्षण मिळाले आहे .यापूर्वी तिने चार विविध सौंदर्य स्पर्धा जिंकल्या असून त्यामध्ये मिस महाराष्ट्र चा समावेश आहे .तिने येथील जैन कॉलेजमधून बीबीए ही पदवी घेतली असून सध्या ती एमबीए करीत आहे.

आपल्या दोन वर्षाचा एमबीए कोर्स पूर्ण झाल्यानंतर चित्रपटसृष्टीत उतरण्याचा आपला मानस आहे असे ती म्हणाली वडिलांनी बनविलेला मोराच्या छबी चा ड्रेस परीक्षकांना फार आवडला असे ती म्हणाली.

याआपल्या यशात आई माधवी, वडिल राजेंद्र यांचे प्रोत्साहन व कॉलेज मॅनेजमेंट चे सहकार्य लाभले आहे असे ती अभिमानाने सांगते

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.