Thursday, April 25, 2024

/

पोट निवडणूकीचे उमेदवार जाहीर

 belgaum

कर्नाटक विधानसभा पोट निवडणुकीसाठी भाजपने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.अथणी मधून महेश कुमठळ्ळी याना,गोकाकामधून रमेश जारकीहोळी याना तर कागवाडमधून श्रीमंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
अथणी मतदार संघातून उप मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना तिकीट देण्याची चर्चा होती. महेश कुमठळ्ळी यांना विधान परिषदेवर घ्यायचे ठरत होते पण सवदी यांना पक्षाने अथणी मधून उमेदवारी दिलेली नाही.त्यामुळे सवदी यांना विधान परिषदेवर घेतले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.बहुचर्चित गोकाक मतदार संघातून रमेश जारकीहोळी यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे अशोक पुजारी नाराज असून ते कोणता निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.