भीमशी यांनी दिला या जारकीहोळी यांना पाठिंबा

0
 belgaum

गोकाक मतदार संघातील लढतीत नित्यनवे रंग भरत आहेत.लखन आणि रमेश जारकीहोळी हे प्रचारा दरम्यान एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.आरोप,प्रत्यारोप प्रचार सभांमधून सुरूच आहेत.त्यात आता आणखी रंग भरले आहेत भीमशी जारकीहोळी यांनी.2008 मध्ये भीमशी यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे अर्ज दाखल करून रमेश यांना आव्हान दिले होते.

भीमशी यांनी आज रमेश यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली.या भेटी दरम्यान भीमशी यांनी रमेश यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

bg
Bhimashi jarkiholi
Bhimashi jarkiholi

रमेश जारकीहोळी यांनी गोकाकामधून पाच वेळा विजय मिळवला आहे.अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी केली असून अनेक योजना आपल्या मतदारसंघात राबवल्या आहेत.त्यामुळे रमेश निवडून येणार हे नक्की असल्याचे भीमशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काँग्रेस उमेदवार लखन जारकीहोळी यांच्या सोबत सतीश जारकीहोळी आहेत तर रमेश यांच्या सोबत भीमशी आणि आमदार असलेले भालचंद्र आहेत त्यामुळे रमेश जारकीहोळी पुन्हा फेव्हरेट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.या अगोदर लखन विरुद्ध रमेश या दुरंगी लढतीत जनता दलाच्या वतीन अशोक पुजारी यांनी उडी लढत तिरंगी बनवली आहे

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.